Skip to main content

Posts

Showing posts from January, 2012

मी पुणेकर

                                          नमस्कार ! तमाम पुणेकरांना नमस्कार ! थेट स्वर्गातूनच नमस्कार ! मी श्वेता .कोण श्वेता ? श्वेता ओस्वाल तर नव्हे?  होय मी श्वेता ओस्वालच . स्वर्गातुनच बोलतेय , तेही यमराजाची खास परवानगी घेउनच.सुरुवातीला ते परवानगी देतच नव्हते , पण स्वारगेट बस डेपोतील बस घेऊन पृथ्वीवर जाईन असे म्हटल्यावर लगेच तयार झाले.                                          त्या संतोष मानेला दोष देणे बंद कराल का ?  अहो रागाच्या भरात माणूस वागतो असे कधीतरी . मला इथे त्याची पहिली पत्नी भेटली होती. जिजाबाई नाव तिचे.किती घाबरलेली होती ती ! आजपण ती भिते त्याला. तिच्या आदित्यने गोटी गीळली होती. आता नवरा काय म्हणेल ? या भितीनेच तिचा जीव गेला होता. इतकी दहशत होती त्याची.मग अशा माणसाला जर कोणी जवळची बस दिली नाही तर मग तो बस पळवून असा आमचा जीव घेनारच ना ! पुणेकरांनो  जरा रस्त्याने जाताना जपुनच जात जा. मी तर म्हणते कि जलप्रवासच सुरु करा. मी इथे पाहिलंय की एस्.टी. मध्ये म्हणे असे अनेक संतोष माने आहेत .परिवहन राज्यमंत्री सुद्धा म्हणतात की एस् .टी. मध्ये काम करायचे असेल तर लांबवर बस न्यावीच  ल