Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

भारतीय समाजमन ....रणजितसिंह डिसले

                     ‘15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला’;इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील  या विधानाची सत्यताच प्रश्नांकित व्हावी असे सामाजिक वर्तन मागील काही वर्षात  दिसून येत आहे. हा देश स्वतंत्र झाला कि निव्वळ राजकीय , आर्थिक व न्यायिक बाबतीत सत्तांतर घडून आले ? असा प्रश्न मनात येतो.सत्तांतर म्हणण्यामागे या क्षेत्रातील इंग्रजाळलेली विचारधारा आहे. राजकीयदृष्ट्या निर्णय घेताना आजही इंग्रज राजवटीतील प्रक्रिया अवलंबली जात आहे.प्रशासनात जबाबदारीचे तत्व लागू करण्यात आपण अयशस्वी ठरत आहोत.आजही आपली न्यायव्यवस्था आंधळी बनून राहिली आहे.ज्या न्याय व्यवस्थेने जनरल डायर ला जालियानवाला बाग हत्याकांडातून निर्दोष मुक्त केले ,तीच न्यायव्यवस्था सलमान खान ला देखील निर्दोष मुक्त करते. कायद्यासमोर सर्वजण समान असतात;काहीजण अधिक समान असतात.या विधानाची प्रचिती आजही वारंवार येतच राहते.भारतीयत्वाचा ठसा असणारी  डोळस न्यायव्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही.न्याय देवता आंधळी असणे हे इंग्रजांचा फायद्याचे होते ;भारतीयांच्या नव्हे.इंग्रजांचे अंधानुकरण व अनुकरणप्रीयता हा आपला स्थायीभाव देशहिताला घातक ठर

पाठ्यपुस्तकाचं तंत्र-मंत्र

पाठ्यपुस्तकाच तंत्र-मंत्र