Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

ग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स

ग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स .......रणजितसिंह डिसले जगभरातील शिक्षकांची व्यावसयिक , सामाजिक व आर्थिक सद्यस्थिती याबाबत वेगवेगळ्या देशांतील शैक्षणिक   व्यासपीठावर सातत्याने चर्चा होत असतात. शिक्षकी पेशाचा सामाजिक दर्जा घसरत आहे याबाबत अनेक शिक्षणतज्ञ चिंता   व्यक्त करत आहेत. सातवा वेतन आयोग वेळेवर मिळावा , ऑनलाईन दिले जाणारे वेतन वेळेवर मिळावे , सेवेत कायम करावे ,   विना अनुदानित तुकड्यांना अनुदान द्यावे अशा मागण्यांकरिता   शिक्षक जेंव्हा संपाचे हत्यार उचलतात तेंव्हा शिक्षकांची आर्थिक सद्यस्थितीदेखील काळजी करण्याजोगी आहे असे दिसून येते. तर अशैक्षणिक कामाच्या ओझ्याने दमलेले शिक्षक आम्हांला शिकवू द्या अशा मागण्या घेवून मोर्चे काढतात त्यावेळी   या पेशातील व्यावसायिक वास्तव समोर येत असते. या पार्श्वभूमीवर जगभरातील शिक्षकांची सद्यस्थिती दर्शवणारा ग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स २०१८   हा महत्वपूर्ण अहवाल ओइसीडी ( OECD ) व   दुबईस्थित वार्के फाउंडेशन यांच्यावतीने नुकताच प्रकाशित झाला. अहवालाची ही दुसरी आवृत्ती असून सन २०१३ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. जागतिक स्तरावर घेतल्या ज