

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत हे तर गेली अनेक वर्ष वाचत आलोय.अर्थ कळत नव्हता तेंव्हापासून वाचतोय. लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणीत अदिती जे इंटीमेंट हे सदर लिहिते ते तिने सुरवात केली तेंव्हा पासून वाचतोय. हिला काय करायच्यात लोकांच्या भानगडी असे नेहमी वाटायचे.हि वेडी आहे का?उगाच का सल्ले देत बसते.असे अनेकदा वाटायचे.पण ते लेख वाचायला मस्त वाटायचे.अरे यार हे प्रेम नेमकं काय असते.?प्रेमात पडतोय हे कसे काय कळत नाही?प्रेमात ही दोघे वेडी कशी होतात?हे मला कळत नव्हते........... आणी अखेर मला ते समजलेच .!!!!!!!!! कारण मीच प्रेमात पडलो ना ...............साधारणतः ६ महिन्यांपूर्वी आमची ओळख झाली.आणी ३ दिवसात तर तिने मला प्रपोज केले.प्रेमातील मानसिक सुखाचा अनुभव मी घेतला.या जगात आपली काळजी घेणारे कोण तरी आहे?ही भावनाच खूप आनंद देते ना ..!!!! १४ फेब्रुवारी ला आम्ही प्रेम निभावण्याची शपथ घेतली खरी पण २५ फेब्रुवारी ला तर आमचे प्रेम तिच्या घरी समजलेच. आणी माझ्या प्रेमाचा निकाल पण लागला. खूप खूप रडलो . मन खूप सैरभैर झाले.जीवन जगण्याची इच्छा नसल्याचे जाणवले. राष्ट्रीय विज्ञान दिनी तिने शेवटचा sms पाठवला.तो वाचून तर अजुनच पागल.अक्षरशः वेडाच होणे बाकी होते.पण सावरणे तर भाग होते.प्रेमभंग झाला म्हणून जीवन संपवण्याचा विचार सोडून देणे भाग होते कारण मी जीवन संपवले तर मग ती पण संपवणार !!!!! माणसे मरणार २ आणी उधवस्त होणार ९ माणसे.हे मला पटत नव्हतेच . या कठीण प्रसंगात अदिती चे जुने लेख वाचून
मनाने उभारी घेतली. thanks Aditi!!!!! मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा तिनेच दिली.आता माझे स्वप्न हे केवळ माझे न राहता दोघांचे होते.असो .ते नाही सांगायचे.

माझ्या मनात जरा वेगळेच विचार येतायेत.ग्रामीण – निमशहरी भागातील पालक आपल्या मुलांना प्रेम का करू देत नसावेत?जिथे मुलामुलींना एकमेकांना एकही शब्द बोलण्याची परवानगी नाही अशा विचित्र वातावरणात अनेकजण वावरतात.मी पण त्यातील एक.पण मनं जुळली एकमेकांचे विचार जुळले की मग नाते का निर्माण करू दिले जात नाही?आणि मी तर आंतरजातीय विवाह करण्याचे स्वप्न पाहत होतो.खरं तर मला अशीच अचाट स्वप्न पडतात.पारंपरिक विचारांना छेद देणारी. आंतरजातीय विवाह न करू देण्यामागे सामाजिक दबावाचा फार मोठा परिणाम पालकांना असे वागण्यात भाग पडत असावा.आपल्या मुलाने वा मुलीने पळून जाऊन लग्न केले तर .................? समाजात आपली बदनामी होईल .”खानदान की इज्जत ....!!!” किंवा ऑनर किलिंग असे प्रकार यातूनच निर्माण होतात ना.मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात अशी घटना घडली. इंदापुरात पण प्रेमी जोडप्याने लग्न करता येत नाही म्हणून आत्महत्या केली. असे अनेक किती बळी जाणार?..... समाजाची मानसिकता कधी बदलणार? विलासराव देशमुखांनी जी हिम्मत दाखवली ती आपण कधी दाखवणार?मुलांचे सुख महत्त्वाचे की समाजातील प्रतिष्टा महत्वाची? आणि जर समाजातील प्रतिष्टा महत्वाची मानली तर मग ऑनर किलिंग चे प्रकार घडत राहणारच.उलट यात वाढच होत जाईल.आज एक प्रेमी म्हणून मी माझी भूमिका मांडतोय असे नाही.कारण या घटनेने एक बाबा माझ्या
लक्षात आली की आपण आणि आपले आईवडील यांच्यात याबाबतीत संवाद वाढायला हवा.सहसा असे विषय आपण शेअर करत नाही.सुसंवादाचा अभाव जाणवतोय....पण मला अजून ही वाटते की माझ्या मैत्रिणीचे मत तिच्या बाबांनी विचारायला हव होते.ती ज्या मुलावर प्रेम करते ज्या सोबत तिने सुखी जीवनाची स्वप्न पाहिली होती ती सर्वच स्वप्न धुळीस मिळाली ना!!!!!!! विशेष असे की तिची स्वप्न तिच्या बाबांनीच उधवस्त केलीत.चक्काचुर झाला स्वप्नाचा. मग भविष्यात मी माझ्या मुलांच्या स्वप्नांचा असा चक्काचुर करावा का ? पालकांना हे कसे सांगावे? आणी पालकांनी मुलांना कसे समजून घ्यावे?सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहतात. तुम्हीच ठरवा काय करायचे ते........

Comments
Post a Comment