आणि अखेर प्रेमभंग झालाच ! मनातील भीती खरी ठरली.म्हणजे माझ्या प्रेमाचा तिने स्वीकार केला नाही , असे नव्हे . पण आमच्या प्रेमाचे लग्नामध्ये रूपांतर होणार नाही हे स्पष्ट झाले.कारण आमच्या प्रेमाची कुणकुण लागताच तिचे लग्न ठरवण्यात आले.एकदम पारंपरिक मार्ग.मुलीला भावनिक आवाहन करून लग्न जुळवणे.तिचा तो भावी नवरा गेली कित्येक दिवस तिच्या घरच्यांच्या मागे लागला होता.अखेर त्याची इच्छा फलद्रूप झाली.नशीबवानच तो. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत हे तर गेली अनेक वर्ष वाचत आलोय.अर्थ कळत नव्हता तेंव्हापासून वाचतोय. लोकमत च्या ऑक्सिजन...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.