Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

RTE 2.0

RTE 2.0 .                                                                                                  १ एप्रिल २०१० पासून अंमलात आलेला बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क हा शिक्षण क्षेत्रातील आजवरचा सर्वात क्रांतिकारी कायदा समजला जातो. ८६ व्या   घटना दुरुस्तीच्या प्रतिपूर्तीकरिता हा कायदा अस्तित्वात आला. मागील ८ वर्षात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अनेक सकारात्मक व दृश्यात्मक बदल देशाच्या शिक्षणव्यवस्थेत झाले आहेत. पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या बालकांचे वाढते प्रमाण , निर्धारित इयत्तेतील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली वाढ व सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या भौतिक सुविधा जसे कि इमारत , वर्गखोल्या , शौचालये व शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती याबाबत देशाने भरीव प्रगती केली आहे असे आर्थिक पाहणी अहवाल २०१८ मध्ये नमूद केले आहे. अर्थात या आकडेवारीबाबत अनेकांचे आक्षेप असू शकतात.मात्र या कायद्यामुळे अनेकविध चांगल्या बाबी शिक्षण क्षेत्रात सुरु झाल्या , हे मान्य करावे लागेल. अर्थात   स्वातंत्र्यानंतर अशा स्वरूपाचा कायदा लागू करण्यात आपण खूप उशीर के