Skip to main content

Posts

Showing posts from 2013

शाळा चालतात किती दिवस ?

शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी  मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला.  लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि  निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध कसा लावला

देवयानी shame on youदेवयानी Shame on u !!!!!! देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते. बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी काळी बाजू मांडू लागली तर हे महाशय याला जातीद्वेष म्हणतात. वा ! आदरणीय बाबासाहेबांनी दलित बांधवांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिलीय. आपला अन्याय आपणच दूर करावा असे बाबासाहेब म्हणत.ते कधी कॉंग्रेसच्या दारात गेले नव्हते . याच कॉंगेसने बाबासाहेबांना मुंबईतून पराभूत केले होते. बाबासाहेब बंगाल मधून जिंकून घटना समितीत गेले होते. कुठे ती बाबासाहेबांची आदर्शवादी शिकवण आणि कुठे तुझे तीर्थरूप ? काल लोकमत च्या मुलाखतीत चे महाशय म्हणतात कि माझ्या मुलीने पाकिस्तानात जीव धोक्यात घालून देशसेवा केली. काय फुकट केली का सेवा? पगार मिळाला नाही का? आणि मग दिवसरात्र सीमेवर आमचे सैनिक काय पाकिस्तानची सेवा करतात काय हो ? या देवयानीला अमेरिकेत नोकरचाकर मिळत नाहीत का? एवढी ऐपत नाहीत का? मग आदर्श सोसायटीत ३-३ flat घ्यायला बरे पैसे आहेत तुझ्याकडे ? या देवयानीला भारतीय कामगार कायद्यानुसार कमी वेतनावर काम करून घेतले म्हणून भारतच खटला भरा. महिलेवर अन्याय केला म्हणून हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार हिला अटक करा. हिला परत संयुक्त राष्ट्रात कशाला पाठवताय? कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे ते वाकडेच राहणार. हे खोब्रागडे कुटुंब देशाची अब्रू वेशीवर टांगतील . त्यापेक्षा घ्या माघारी बोलावून तिला. या अधिकार्याने महिला कामगारवर अन्याय केला म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. आणि पोलिसांनी देवयानीची चौकशी केली. इतके साधे चे प्रकरण . पण पहा रंग कसे दिलाय तो ! आता अमेरिकन पोलीस म्हणजे काय नाक्यावरचा पोलीस नाही ना. चिरीमिरी देऊन सुटायला. ते पोलीस त्यांच्या अध्यक्षाच्या पत्नीला सुद्धा अटक करायला मागे पुढे पाहत नाहीत मग हि देवयानी तर कीस झाड कि पत्ती ! पुढे काय म्हणतात हिचे तीर्थरूप तर म्हणे त्या संगीताने अमेरिकेत गेल्यावर मी पार्ट टाइम काम करणार असे सांगितले. अहो खोब्रागडे आम्ही काय अमेरिकेत गेलो नाही काय? व्हिसा मधील कोणतीही अट मनमानी पद्धतीने बदलता येत नाही. त्यासाठी वकिलातीची परवानगी घ्यावी लागते. ना संगीता पार्ट टाइम काम करू शकते ना देवयानी कमी पगार देऊ शकते. आपण दलित असल्याचे भांडवल करू नका खोब्रागडे. कायद्यानुसार होणाऱ्या करवाईला सामोरे जा. आणि हो अमेरेकन वकिलातीला विशेष सुरक्षा पुरवायला कोणी सांगितले होते? देवयानीवर अन्याय केला म्हणून भारत काय करतो तर बॉरीकेट काढून घेतो. आणि सांगतो कि तुम्हाला आता नियमानुसारच संरक्षण मिळेल. पण इतके दिवस दिलेच कसे चे संरक्षण ? नियम तोडायला कोणी सांगितले होते? अमेरिकन लोक भारतात राहतात ते त्यांच्या बळावर. आपल्या सुरक्षेवर त्याना सोडा आपल्याला पण विश्वास नाही. आपली सुरक्षा राहुल नावाच्या शेंडफळाला. दोन दिवस एका गरीब घरात राहायचे. परत ढुंकून पण पहायचे नाही. कागद फाडून टाका कायदे फाडा असे म्हणायचे . मग काय लोक यालाच निवडणुकात फाडून टाकतात. कारण याचा दुटप्पीपणा लक्षात येतोय ना. याची आई उत्तर प्रदेशातील महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला म्हणून लगेच पत्र लिहिते पण हिचा जावई हिमाचल मध्ये एका अधिकाऱ्याला कसा छळतो त्या कडे हिचे मात्र दुर्लक्ष. असो. थांबतो आता. उद्या पेपर आहे त्याचा अभ्यास करतो.

देवयानी Shame on u !!!!!! देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP  वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला  सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते. बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी

सुटलो रे बाबा सुटलो

                सुटलो रे  बाबा सुटलो तमाम भारतीयांना नमस्कार ! मी सरबजितसिंग बोलतोय. मला खूप खूप पश्याताप होतोय कि मी भारतात जन्माला आलो. जर मी पाकिस्तानी नागरिक असतो तर ना आज मी भारताच्या जेल मध्ये मस्तपैकी बिर्याणी खात बसलो असतो. जय हो गांधीजी ! तुमच्या आदर्श्यांवर भारताची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अहिसा हे तत्व सोनिया विसरलेल्या नाहीत ह ! गांधीगिरी चा विजय असो ! तिकडे चीन उद्या दिल्लीपर्यंत येण्याची आपण वाट पाहू. तोवर आपण निषेध नोंदवणे सुरु ठेउयात. इंग्रज काळात मवाळवादी नेते करत असत ते काम करण्याची आपली नीती किती कार्यक्षम आहे याचा आपण कधी विचार करणार आहोत ? त्या इटली च्या नौसैनिकांनी आपलेच जवान मारले आणि वर देशात पळून गेले. त्यांना फाशी देणार नाही म्हणून त्यानं परत आणले. आता काय त्यांना मरेपर्यंत पोसाय्चेय का?  भारतीयानो चला लवकर मेणबत्त्या घेऊन माझ्या अंतयात्रेला येणार ना ? आणि हो निषेधाचे फलक पण आणा ह. तुम्ही भारतीय ठेवढेच करू शकता. एक तर गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य  मिळायला ३० वर्षे उशीर झाला आणि आता या सोनिया गांधी वर विश्वास ठेऊन जर भारत महासत्ता
“ अनेकवेळा एमपीएससी देण्याऱ्या गरीब मुलाचे काही अजाण प्रश्न ”                                अखेर एम.पी.एस.सी. ने परीक्षा पुढे ढकलली. मुळात परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्याने बदल करणे हे एम.पी.एस.सी चे वैशिट्य आहे. मागील वर्षातील परीक्षाचे वेळापत्रक पहिले तर लक्षात येते कि PSI , STI , ASST, MPSC या परीक्षा नियोजित वेळापत्रकात बदल करूनच घेतल्या आहेत. मग यावेळी परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. वेळापत्रक न पाळणे , वेब साईटवर व्हायरसचा हल्ला होणे   हि तर बेजबाबदार कामाची पावती आहे. एक नजर टाकू अशाच कारभारावर.             मुळात एम.पी.एस.सी ने सर्व बदल यूपीएससी च्या धर्तीवर स्वीकारले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात जसा यूपीएससी ने गोंधळ माजवला तसा गोंधळ आपण पण घालू असे जर एम.पी.एस.सी वाटले तर चुकीचे नसावे. यूपीएससी चे बदल १.       अभ्याकरमात बदल २.       परीक्षा पध्दतीत बदल ३.       गुणवत्तेत तडजोड न करणे. ४.       परीक्षा निकाल यांचे वेळापत्रकात अचानक बदल न करणे. यूपीएससी ने या बदलांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली होती. सन २०११च्या डिसेंब

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा.

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा. ”   अरे काय   तुला   वेड लागलाय का ? चप्पल आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध.   आहे हो. कसं आहे मित्रांनो   जर आपले   पाय पोळत असतील तर काय करतो   आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत असतो. पण   पाय पोळू लागले म्हणून तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे. आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू नका तुम्ही अगोदर चप्पल घाला   मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा भ्रष्टाचार करतो. चला आता आपण समाजातील इतर लोक कसा भ

लोकशाही अमर रहे!

       नमस्कार ! “ IBN माझा “ च्या “ विशेष सवाल “  मध्ये आपले स्वागत. आजचा सवाल आहे              “ वागळे, खांडेकर गेले कुठे ? ”. आमचे संपादक वागळे आणि खांडेकर अज्ञातवासात गेल्यामुळे  मी जनतेचा सेवक आमदार क्षी.ठा.नालासोपारकर आपले मन:पूर्वक स्वागत करतो. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी जेलमधून थेट हा कार्यक्रम सदर करत आहे . लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे! अशा घोषणा देतच मी जेल मध्ये आलोय. बरं झाले त्या सूर्यवंशी ला चोपला ते.नाहीतर लोकशाही चा अपमान झाला असता. सारे पोलीस माजलेतच साले.थेट आमदार ची गाडी आडवतात ! काय अक्कल आहे कि नाही.आमदार म्हणजे जनतेचा सेवक,. या जनतेच्या सेवकाने १५० च्या वेगाने गाडी चालवली तर बिघडले कुठे? कुणाला उडवले तर नाही ना? जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी गाडी वेगात चालवावी लागते हे यांना कसे कळणार?. मी तर विधान सभा अध्यक्ष साहेबांकडे अशी मागणी करतो कि मला तर २०० च्या वेगाने गाडी चालवण्याची परवानगी द्या. नाही तर माझ्या मतदारसंघातून माझ्या वर टीका होईल.जनता माझ्या वर नाराज होईल.हि नाराजी परवडणार नाही.माझी एवढी विनंती मान्य कराच. हवी तर वसई ची केळी पाठवतो. आ

भ्रष्टाचार

चला आपण  सगळे मिळून भ्रष्टाचार करू! हो ! वाचून जरा विचित्र वाटतंय ना . पण करूनच पाहू ना भ्रष्टाचार. मी तर रोजच करतो. कसा ? तर मग हे नक्कीच वाचा  मी आहे एक शिक्षक. मी रोजच शाळेत उशिरा जातो. रजा न मांडताच सुट्टीवर जातो. रजेच्या काळातील पगार साहेबांना लाच देऊन घेतो. शाळेचा अनुदान खर्च बोगस पावत्या जोडून दाखवतो. आणि जर ऑडीट मध्ये घोळ लक्षात आला तर ऑडीटर ला लाच देऊन ते प्रकरण मिटवतो. एखादा अधिकारी  ( केंद्रप्रमुख , विस्ताराधिकारी ) जर कारवाई करतो अशी धमकी देऊ लागला तर मग त्याला पण लाच द्यायची वर ढाब्यावरील जेवण पण  हं.  मग सांगा किती मस्त आहे सरकारी नौकरी. वाचकहो एका शिक्षकाला एवढाच भ्रष्ट्राचार करता येतो. जरा वेगळ्या बाजूने पहिले तर लक्षात येईल कि या सरकारी व्यवस्थेत जर एखाद्या शिक्षकाने जर प्रामाणिकपणे सेवा करायचे ठरवले तर त्याला जरा कठीणच जाते. पण मी जो भ्रष्टाचार सांगितला आहे तो त्याला करावाच लागतो.. मी काही समर्थन करत नाही पण जर मी तो केला नाही तर मग मला नाहक त्रास सहन करवा लागतो. कसा ते पहा. मी सरकारी नौकर म्ह