Skip to main content

देवयानी shame on youदेवयानी Shame on u !!!!!! देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते. बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी काळी बाजू मांडू लागली तर हे महाशय याला जातीद्वेष म्हणतात. वा ! आदरणीय बाबासाहेबांनी दलित बांधवांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिलीय. आपला अन्याय आपणच दूर करावा असे बाबासाहेब म्हणत.ते कधी कॉंग्रेसच्या दारात गेले नव्हते . याच कॉंगेसने बाबासाहेबांना मुंबईतून पराभूत केले होते. बाबासाहेब बंगाल मधून जिंकून घटना समितीत गेले होते. कुठे ती बाबासाहेबांची आदर्शवादी शिकवण आणि कुठे तुझे तीर्थरूप ? काल लोकमत च्या मुलाखतीत चे महाशय म्हणतात कि माझ्या मुलीने पाकिस्तानात जीव धोक्यात घालून देशसेवा केली. काय फुकट केली का सेवा? पगार मिळाला नाही का? आणि मग दिवसरात्र सीमेवर आमचे सैनिक काय पाकिस्तानची सेवा करतात काय हो ? या देवयानीला अमेरिकेत नोकरचाकर मिळत नाहीत का? एवढी ऐपत नाहीत का? मग आदर्श सोसायटीत ३-३ flat घ्यायला बरे पैसे आहेत तुझ्याकडे ? या देवयानीला भारतीय कामगार कायद्यानुसार कमी वेतनावर काम करून घेतले म्हणून भारतच खटला भरा. महिलेवर अन्याय केला म्हणून हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार हिला अटक करा. हिला परत संयुक्त राष्ट्रात कशाला पाठवताय? कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे ते वाकडेच राहणार. हे खोब्रागडे कुटुंब देशाची अब्रू वेशीवर टांगतील . त्यापेक्षा घ्या माघारी बोलावून तिला. या अधिकार्याने महिला कामगारवर अन्याय केला म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. आणि पोलिसांनी देवयानीची चौकशी केली. इतके साधे चे प्रकरण . पण पहा रंग कसे दिलाय तो ! आता अमेरिकन पोलीस म्हणजे काय नाक्यावरचा पोलीस नाही ना. चिरीमिरी देऊन सुटायला. ते पोलीस त्यांच्या अध्यक्षाच्या पत्नीला सुद्धा अटक करायला मागे पुढे पाहत नाहीत मग हि देवयानी तर कीस झाड कि पत्ती ! पुढे काय म्हणतात हिचे तीर्थरूप तर म्हणे त्या संगीताने अमेरिकेत गेल्यावर मी पार्ट टाइम काम करणार असे सांगितले. अहो खोब्रागडे आम्ही काय अमेरिकेत गेलो नाही काय? व्हिसा मधील कोणतीही अट मनमानी पद्धतीने बदलता येत नाही. त्यासाठी वकिलातीची परवानगी घ्यावी लागते. ना संगीता पार्ट टाइम काम करू शकते ना देवयानी कमी पगार देऊ शकते. आपण दलित असल्याचे भांडवल करू नका खोब्रागडे. कायद्यानुसार होणाऱ्या करवाईला सामोरे जा. आणि हो अमेरेकन वकिलातीला विशेष सुरक्षा पुरवायला कोणी सांगितले होते? देवयानीवर अन्याय केला म्हणून भारत काय करतो तर बॉरीकेट काढून घेतो. आणि सांगतो कि तुम्हाला आता नियमानुसारच संरक्षण मिळेल. पण इतके दिवस दिलेच कसे चे संरक्षण ? नियम तोडायला कोणी सांगितले होते? अमेरिकन लोक भारतात राहतात ते त्यांच्या बळावर. आपल्या सुरक्षेवर त्याना सोडा आपल्याला पण विश्वास नाही. आपली सुरक्षा राहुल नावाच्या शेंडफळाला. दोन दिवस एका गरीब घरात राहायचे. परत ढुंकून पण पहायचे नाही. कागद फाडून टाका कायदे फाडा असे म्हणायचे . मग काय लोक यालाच निवडणुकात फाडून टाकतात. कारण याचा दुटप्पीपणा लक्षात येतोय ना. याची आई उत्तर प्रदेशातील महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला म्हणून लगेच पत्र लिहिते पण हिचा जावई हिमाचल मध्ये एका अधिकाऱ्याला कसा छळतो त्या कडे हिचे मात्र दुर्लक्ष. असो. थांबतो आता. उद्या पेपर आहे त्याचा अभ्यास करतो.

देवयानी Shame on u !!!!!!
देवयानी तू एक अधिकारी आहेस. बाहेरच्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतेस. मग त्या देशाचे नियम पाळण्याचे भान तुला नाही काय ? तू नियम तोडणार आणि तुला तुरुंगात VIP  वागणूक द्यावी अशी मागणी करणार. हा तर निर्लज्जपणाच म्हणावा लागेल. तो काय भारत आहे का?तू अधिकारी आहेस म्हणून तुला तुझे फाझील लाड करायला, तुला  सोडून द्यायला?तुझ्यासाठी भारताची प्रतिष्ठा का पणाला लावतेस? तू आणि तुझे कुटुंबीय काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे सारेच जाणतात. मग का हा खटाटोप ? म्हणे देवयानीला अटक केल्याने भारताचा अपमान झाला? सरबजितसिंग ची जेलमध्ये हत्त्या झाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? कारण तो एक शीख होता ना. आणि शीख बांधवांविषयी कॉंग्रेसचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय जवानांची शीर नसलेली प्रेते मिळाली तेंव्हा भारताचा अपमान झाला नव्हता का ? नरेंद्र मोदी ना अमेरिकेने व्हिसा नाकारला तेंव्हा नव्हता भारताचा अपमान ? त्यावेळी हे सर्व तुझे कार्यकर्ते कुठे होते.
बाकी तुझ्या तीर्थरुपांना राजकारण करायला छान जमते . मी उपोषण करणार. मी सोनियांना भेटणार. काही इंग्रजी प्रसारमाध्यमे तुझी  काळी बाजू मांडू लागली तर हे महाशय याला जातीद्वेष म्हणतात. वा ! आदरणीय बाबासाहेबांनी  दलित बांधवांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिलीय. आपला अन्याय आपणच दूर करावा असे बाबासाहेब म्हणत.ते कधी कॉंग्रेसच्या दारात गेले नव्हते . याच कॉंगेसने बाबासाहेबांना मुंबईतून पराभूत केले होते. बाबासाहेब बंगाल मधून जिंकून घटना समितीत गेले होते. कुठे ती बाबासाहेबांची आदर्शवादी शिकवण आणि कुठे तुझे तीर्थरूप ? काल लोकमत च्या मुलाखतीत चे महाशय म्हणतात कि माझ्या मुलीने पाकिस्तानात  जीव धोक्यात घालून देशसेवा केली. काय फुकट केली का सेवा? पगार मिळाला नाही का? आणि मग दिवसरात्र सीमेवर आमचे सैनिक काय पाकिस्तानची सेवा करतात काय हो ? या देवयानीला अमेरिकेत नोकरचाकर मिळत नाहीत का? एवढी ऐपत नाहीत का? मग आदर्श सोसायटीत ३-३ flat  घ्यायला बरे पैसे आहेत तुझ्याकडे ? या देवयानीला भारतीय कामगार कायद्यानुसार कमी वेतनावर काम करून घेतले म्हणून भारतच खटला भरा. महिलेवर अन्याय केला म्हणून हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार हिला अटक करा. हिला परत संयुक्त राष्ट्रात कशाला पाठवताय? कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे ते वाकडेच राहणार. हे खोब्रागडे कुटुंब देशाची अब्रू वेशीवर टांगतील . त्यापेक्षा घ्या माघारी बोलावून तिला. या अधिकार्याने महिला कामगारवर अन्याय केला म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. आणि पोलिसांनी देवयानीची  चौकशी केली. इतके साधे चे प्रकरण . पण पहा रंग कसे दिलाय तो ! आता अमेरिकन पोलीस म्हणजे काय नाक्यावरचा पोलीस नाही ना. चिरीमिरी देऊन सुटायला. ते पोलीस त्यांच्या अध्यक्षाच्या पत्नीला सुद्धा अटक करायला मागे पुढे पाहत नाहीत मग हि देवयानी तर कीस झाड कि पत्ती ! पुढे काय म्हणतात हिचे तीर्थरूप तर म्हणे त्या संगीताने अमेरिकेत गेल्यावर मी पार्ट टाइम काम करणार असे सांगितले. अहो खोब्रागडे आम्ही काय अमेरिकेत गेलो नाही काय? व्हिसा मधील कोणतीही अट मनमानी पद्धतीने बदलता येत नाही. त्यासाठी वकिलातीची परवानगी घ्यावी लागते. ना संगीता पार्ट टाइम काम करू शकते ना देवयानी कमी पगार देऊ शकते. आपण दलित असल्याचे भांडवल करू नका खोब्रागडे. कायद्यानुसार होणाऱ्या करवाईला सामोरे जा.

आणि हो अमेरेकन वकिलातीला विशेष सुरक्षा पुरवायला कोणी सांगितले होते? देवयानीवर अन्याय केला म्हणून भारत काय करतो तर बॉरीकेट काढून घेतो. आणि सांगतो कि तुम्हाला आता नियमानुसारच संरक्षण मिळेल. पण इतके दिवस दिलेच कसे चे संरक्षण ?  नियम तोडायला कोणी सांगितले होते? अमेरिकन लोक भारतात राहतात ते त्यांच्या बळावर. आपल्या सुरक्षेवर त्याना सोडा आपल्याला पण विश्वास नाही. आपली सुरक्षा राहुल नावाच्या शेंडफळाला. दोन दिवस एका गरीब घरात राहायचे. परत ढुंकून पण पहायचे नाही. कागद फाडून टाका कायदे फाडा असे म्हणायचे . मग काय लोक यालाच  निवडणुकात फाडून टाकतात. कारण याचा दुटप्पीपणा लक्षात येतोय ना. याची आई उत्तर प्रदेशातील महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला म्हणून लगेच पत्र लिहिते पण हिचा जावई  हिमाचल मध्ये एका अधिकाऱ्याला कसा छळतो त्या कडे हिचे मात्र दुर्लक्ष. असो. थांबतो आता. उद्या पेपर आहे त्याचा अभ्यास करतो.

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...