Skip to main content

सफर कासवाच्या हॉस्पिटलची..........रणजितसिंह डिसले


 भारतासारख्या देशात,  जिथे अनेक  नागरिकांना  पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नाही,आवश्यक संख्येएवढे दवाखाने नाहीत,  तेथील नागरिकांना  या लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  मानव सोडून इतर प्राण्यांकरिता देखील  आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात किंबहुना मुक्या प्राण्याचा तो अधिकार आहे,  हे भारतीय नागरिकांना कितपत रुचेल याबाबत माझ्या मनात  शंकाच आहे.भारत देशांचे नागरिक ज्या वर्गखोलीत घडवले जात आहेत , त्याच वर्गखोलीत बसून अमेरिकेत असलेल्या  कासवांच्या हॉस्पिटलची सफर करण्याचा अनुभव जि.प.शाळा,परितेवाडीच्या मुलानी  स्वातंत्र्यदिनी घेतला. त्याविषयीचा हा लेख ........
         साधारणपणे दोन महिन्यापूर्वी कासवांच्या हॉस्पिटलबाबत मला माहिती मिळाली. शाळेतील  मुलांना मी याबाबत सांगितले तेंव्हा त्यानाही आश्चर्यच वाटले. कासवांना कोणते आजार होत असावेत? कासव आजारी पडलं हे कसं ओळखायचं? कासव औषध कसे खाणार? त्याला सलाईन लावायचे असेल तर कसे लावणार ?  अन मुळात म्हणजे कासवांचे डॉक्टर आहेत तरी कोण? असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले. मात्र माझ्याकडे यातील एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. अमेरिकेत कासवांचे हॉस्पिटल आहे इतकीच माहिती मला होती. मुलांची उत्सुकता पाहून मी त्या हॉस्पिटलच्या संचालिका  टेरेसा यांना मेल केला अन आमच्या शाळेतील मुलांकरिता कासवांच्या  हॉस्पिटलची व्हर्च्युअल ट्रीप आयोजित करण्याबाबत  विनंती केली. त्यांनी आम्हाला १५  ऑगस्ट या  दिवशी सायंकाळी ५.३० ची वेळ दिली. प्रमाणवेळेतील फरक लक्षात घेता आमच्या दृष्टीने ही वेळ सोईची होती  त्यामुळे मुलांनी लगेच ही वेळ मान्य केली. आता वेळ निश्चित झाल्यानंतर आमच्या समोर महत्वाचा प्रश्न होता  अखंडित विजेचा. १५ ऑगस्ट रोजी  वीज  खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न म्हणून वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती पत्र दिले. त्यांनीही निश्चिंत रहा असे सांगितले.खबरदारीचा उपाय म्हणून जनरेटर देखील तयार ठेवले होते.  
      
    एकीकडे भारत देश स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करण्यात मश्गुल असताना आमच्या या छोटेखानी शाळेत वेगळीच लगबग सुरु होती.  कासवांच्या हॉस्पिटल बाबत अनेकविध कल्पना  रंगवलेली मुले आता हॉस्पिटलची व्हर्च्युअल ट्रीप करण्यासाठी  सज्ज होती. एका मुलीने तर कासवांसाठी खाऊ पण आणला होता. मुलांची ही लगबग पाहून मला आनंदच होत होता.  सायंकाळी ठीक ५.३० वाजता टेरेसा यांनी स्काईप कॉल केला अन शाळेतील पडद्यावर हॉस्पिटल मधील कासव दिसू लागले. कासव पाहताच मुलांनी एकच कल्ला सुरु केला.काही जण जोरात टाळ्या वाजवू लागले.पाण्यात पोहणारी कासवे  पाहून झालेला आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. टेरेसा यांना देखील याचे आश्चर्य वाटले. मुलांना थोडे स्थिर होवू दिल्यानंतर त्यांनी संभाषण सुरु केले. अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मँरेथाँन शहरात  हे सुसज्ज असे हॉस्पिटल सन १९८६ पासून  कासवांच्या सेवेत आहे. रिची मोरेटी  यांनी आपले मोटेल बंद करून त्याच जागी हे कासवांचे हॉस्पिटल सुरु केले.मेक्सिकन खाडीच्या किनारी वसलेले हे हॉस्पिटल आजवर  शेकडो कासवांसाठी वरदान ठरले आहे. आज या हॉस्पिटल मध्ये एकूण ४९ कासवे  उपचार घेत असून त्यातील ३२ कासवे कायमस्वरूपी उपचाराकरिता तर  १७ कासवे विशिष्ट कालावधीकरिता दाखल झाली आहेत. उपचारानंतर प्रत्येक कासव मेक्सिकन खाडीत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिली जाते. संभाषणाच्या सुरुवातीला त्यांनी  कर्टीन नावाचे कासव त्यांच्या हातात घेतले अन कासवाच्या अवयवांविषयी सांगायला सुरुवात केली.कर्टीन चे डोळे, पाय, त्याची टणक पाठ दाखवत त्यांनी   कासवांच्या अवयवांविषयी सविस्तर माहिती दिली. इथे दाखल होणाऱ्या प्रत्येक कासवाकरिता वेगवेगळे हौद बांधले असून त्यात पाणी व नैसर्गिक खाद्य पुरवले  जाते. प्रत्येक कासवाला  विशिष्ट नाव दिले जाते व त्या नावाचा  टँग त्याच्या पाठीवर लावला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात ट्युमर झालेल्या कासवांची माहिती देण्यात आली.  यातील अनेकांच्या पायावर ट्युमर झाले होते. काहींचे पाय शार्क माशांनी खाल्यामुळे अर्धवट होते , तर काहीना मालवाहू बोटींनी दिलेल्या धडकेमुळे जायबंदी व्हावे लागले होते.मात्र इथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर बहुतांश कासवे जिवंत राहतात असे टेरेसा यांनी सांगितले. टेरेसा यांनी कॅमेरा वळवताच काही लाजाळू कासवे पटकन पाण्याखाली जात असत. मात्र काही धीट व माणसाळलेली कासवे आपला चेहरा दाखवत होती. आजारी कासवांसोबतच काही नवजात कासवे देखील इथे दाखल होतात. मात्र ती पुरेशी तंदुरुस्त झाली कि लगेच सोडून दिली जातात. या ठिकाणी ऑपरेशन रूम देखील असून तिथे दोन कासवांचे उपचार सुरु होते. मात्र आमच्या मुलांचा वयोगट लक्षात घेता त्यांना उपचाराची दृश्ये न दाखवणे उचित राहिले. मात्र माणसांप्रमाणेच या कासवांची देखील काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले. ही दृश्ये पडद्यावर पाहत असतानाच साक्षीने प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. “ टेरेसा मँडम , या कासवांना सलाईन कसे लावतात हो ? ” असे साक्षीने विचारले.तिच्या या प्रश्नाचे टेरेसा यांना कौतुक वाटले. मात्र कासवांना सलाईन न लावता आम्ही द्रवरूप  इन्जेक्शन देतो असे टेरेसा यांनी सांगितले. तेवढ्यात एका कोपऱ्यातून महेशने प्रश्न केला, “ हौदात राहून कासव कंटाळत नाही का?”. यावर टेरेसा काहीशा हसल्या अन म्हणाल्या , “ प्रत्येक कासव केवळ उपचारापुरते या हौदात ठेवले जाते. त्याला दिलेली औषधे, त्याच्यावर सुरु असणारे उपचार  यांचा कितपत परिणाम होतोय? हे लक्षात येण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. याकरिता त्यांना या हौदात ठेवले जाते. नंतर मग त्यांना हॉस्पिटलच्या तलावात ठेवले जाते”. टेरेसा यांच्या उत्तराने महेशची काळजीच मिटली.

            हॉस्पिटलच्या शेवटच्या भागात एक मोठा तलाव बांधण्यात आला आहे. मेक्सिकन खाडीचे पाणी थेट तलावात येते. या तलावात दीर्घकालीन उपचारासाठी दाखल झालेली कासवे असतात. या कासवांना आयुष्यभर उपचार गरजेचे असतात, म्हणून त्यांना असे वेगळे ठेवले जाते. ही कासवे इतकी माणसाळली आहेत कि टेरेसा यांनी नाव घेताच अनेकजण पाण्याबाहेर येवून आपली ओळख दाखवत होती. काही कासवे मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसली. “ मी , कासवांकरिता खावू आणलाय , देवू का? ” असे ऋतुजाने विचारले. उपचारादरम्यान कासवांच्या आहारावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक केलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलेला आहारच दिला जातो. त्यामुळे तू आणलेला आहार कासवांना देता येणार नाही, पण तो खावू मी खाल्ला तर तुझी हरकत नाही ना ? असा प्रतिप्रश्न करताच ऋतुजाने आपला होकार दर्शवला.

         सत्राच्या शेवटी हॉस्पिटल मध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या कासवांची नावे काय ठेवू ? असे टेरेसा यांनी विचारताच अनेकांनी हात वर केले. सरतेशेवटी अनेक पर्यांयामधून क्रिशटाँम या दोन नावांवर एकमत झाले अन टेरेसा यांनी आमचा निरोप घेतला.
रणजितसिंह डिसले

   




 

Comments

  1. खुपच सुंदर माहिती व ट्रिप.
    जि.प.शाळेत असे अनुभव मिळणे व असे शिक्षक मिळणे म्हणजे पर्वणीच विद्यार्थी वर्गासाठी.

    ReplyDelete
  2. खूपच छान सर...

    ReplyDelete
  3. छान...!!!

    ब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून भेट द्या http://bit.ly/2x3ka4p

    ReplyDelete
  4. Very effective way to give an experience of sensitivity, I feel great to read this..thank you

    ReplyDelete
  5. खूपच छान अनुभव रणजितदा !!

    ReplyDelete
  6. खूपच छान उपक्रम !आजच मी शिक्षणपरिषदेमध्ये आपल्या नवनवीन उपक्रमांबद्दल शिक्षकबांधवांना माहिती दिली. श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे जि.प.प्राथ.शाळा पिंपळगांवपिंप्री ता.जामनेर जि.जळगाव
    मुळगाव- आवाटी ता करमाळा जि.सोलापूर

    ReplyDelete
  7. अतिशय स्तुत्य उपक्रम 💐 💐 💐

    ReplyDelete
  8. Great sirji.
    Aple pan ek skype session ayojit karuyat,
    Tumchya ya dnyanacha fayda mazya shaletil mulana pan hoil.

    ReplyDelete
  9. Mala yek help havi hoti.mazya kasvane khup divsanpasun kahich khalla nahiye aani te dolepn ughadat nahiye tr pls.kahi upay asel tr mla sangana pls.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला काही उपाय मिळाला का असेल तर आम्हाला हि कळवा सेम प्रॉब्लेम आमच्या कासवाचा पण आहे

      kambarem@yahoo.com var kalava

      Thank u

      Delete
  10. Dada farch bhannat kalpna waprata tumhi,asch ek session amchya mulan sathi karta yeil ya sathi nakki prayatn karen. Far chan!

    ReplyDelete
  11. टेरेसा मॅडमांचा email पाठवा सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...