Skip to main content

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                       राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५

                          (मराठी  अनुवाद)                     रणजितसिंह डीसले
मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.  

प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते.

ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे.
“ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it)
यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते.
सुरवातीच्या प्रकरणात १९४७ पासून च्या विविध शिक्षण विषयक धोरणाचा आढावा घेतला आहे.भारताच्या राज्यघटनेची धर्मनिरपेक्ष ता , एकात्मता यांसारख्या वैशिष्ट्या ना समोर ठेवत विचार - कृती स्वातंत्र्य,परस्पर आदरभाव , वेगवेगळ्या प्रसंगांना अधिक लवचिक व नाविन्यपूर्ण रीतीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे , आर्थिक प्रगती व सामिजिक बदलात कृतीशील सहभाग देणारा नागरिक घडव्याची अपेक्षा आहे.

teaching म्हणजे लोकशाही बळकट करणारी सेवा असे यांना वाटते. अर्थात याचा जर खोलात जावून विचार केला तर हे विधान निश्चित च पटते. कारण RTE कायद्याचे पालन करून आम्ही teacher नकळत लोकशाहीला बळकट करतोय च की.
त्याचवेळी बालक व पालक यांवर मानसिक तणाव व बौद्धिक ओझे निर्माण करणारी यंत्रणा हे चित्र बदलण्यासाठी खालील पंचसूत्री सुचवलीय.
१.शाळेच्या बाहेरील ज्ञानाशी  संबंध प्रस्थापित करणे.
२.शिकणे व शिकवणे यांच्या पारंपारिक पद्धीताला फाटा देणे.
३.पाठ्यपुस्तके ओलांडणारा अभ्यासक्रम तयार करावा.
४.परीक्षा पद्धत अधिक लवचिक करावी.
५. लोकशाही मुल्यांची अधिक जपणूक करावी.
आजवरच्या बहुतांश अध्ययन –अध्यापन कृती या ECCE वर अवलंबून आहेत.इतकेच काय curriculum वर देखील ECCE चा प्रभाव जाणवतो.
ज्ञानाची रचना कशी करावी व त्यातून मूल कसे शिकते हे प्रकरण २ मध्ये मांडलेय.यातून काही शिफारशी प्रकरन३ मध्ये मांडल्यात ज्यात अभ्यासक्रमाची वेगवेगळी क्षेत्रे सानागितली आहेत.
अभ्यासक्रम , पाठ्यक्रम यातून teacher ने वर्गात बालकाच्या सभोवतालच्या परिस्थितीला अनुकूल अशा कृतींची सांगड घालावी कि त्यातून मुले ज्ञानाची रचना करण्यास प्रवृत्त होतील.आपल्या कृती  अशा असाव्यात कि ज्यातून बालकाच्या शिकण्याच्या उपजत इच्छा प्रोत्सहीत व्हावी.कारण सभोवतालचे विश्व जाणून घेण्याची बालकाची धडपड ही कृती तून व्यक्त होते.
अगदी सोप्या भाषेत सांगू का
तर लहान मूळ किती सारख कृती करत असत. ते आपल्या सारख स्वस्थ बसत का एका जागी? नाही . का नाही  बसत ? तर त्याला हे विश्व जाणून घ्यायचे असते. म्हणून ते धडपडत असते. मात्र teacher म्हणून आपण अशा कृतींची निवड करावी कि ज्या बालाकचे अनुभव समृद्ध करतील.एक मात्र जाणीवपूर्वक लक्षात ठेवा कि ज्ञान हे माहिती पासून कायम वेगळे राहिले पाहिजे. नाहीतर माहितीलाच ज्ञान समजण्याची गल्लत होईल. याठिकाणी ज्ञान रचनावाद स्पष्ट होतोय असे वाटते.
(मात्र ग्रुप वर वेगळाच ज्ञान रचनावाद वाचला होता.)
पाठांतराला प्रोत्साहन देणारी कृती means अध्यापन असे न करता एक पूर्णतः व्यावसायिक कृती म्हणजे अध्यापन असायला हवे.
भाषा, गणित,विज्ञान व सामाजिक शास्त्रे अशी आपल्या अभ्यासक्रमाची सर्वपरिचित असे विभाग आहेत.मात्र यात देखील बदल करावेत असे सुच्वालेय.यातून बालकाला एकत्रित पद्धतीचे ज्ञान मिळावे असाच प्रयत्न असावा.
( महाराष्ट्र सरकारने यासाठीच तर ४ थी च्या पाठ्यपुस्तकात विज्ञान व सामजिक शास्त्र हे विषय एकाच पुस्तकात शिकवावे असा निर्णय घेतला नाही ना.) पण सरकारचा हा बदल मला अमान्य आहे. तो वरील integrated knowldge शी सुसंगत वाटत नाही.
पाठ्यपुस्तकात बालकाच्या स्थानिक अनुभवाला प्राधान्य द्व्यावे . त्याची बोली भाषा हि स्वीकारली च पाहिजे. त्याक वेळी त्रिभाषा सूत्राचा देखील स्वीकार कायम ठेवण्यात यावा असाही आग्रह आहे.कारण बहुभाषा समृद्ध अशा भारतात बोली भाषा जतन केलीच पाहिजे.
गणितातून मुलांना तार्किक विचारांना प्रोत्साहन , समस्या निराकरण क्षमता विकसन व्हायला हवे.गणिताचा इतर विषयांशी सहज समवाय साधता येईल.
विज्ञान विषया संदर्भात खालील अपेक्षा आहेत:
. दैनंदिन जीवनातील अनुभावामागील तर्कसंगत शास्त्रीय विश्लेषण करता यावे.
. वातावरण बदलाविषयी जागरूकता निर्माण करावी.
.प्रोजेक्ट based teaching असावे.
. चिल्ड्रेन science कॉंग्रेस सारखा व्यासपीठाचा वापर करावा.
अशाच पद्दतीने सामजिक शास्त्रे साठी पण सूचना आहेत.
सोबतच कार्य कला हस्तकला शाररीक शिक्षण साठी पण विचार मांडलेत.
उदा. कार्य : यातून ज्ञानाचे उपयोजन हि क्षमता विकसित व्हावी
         प्रत्यक्ष अनुभवाला महत्व.... नवनिर्मिती, स्वयंसिद्धता, परस्पर सहकार्य यांची रुजवण यातून होणे अपेक्षित.
हस्तकला याचा जाणीवपूर्वक उल्लेख. हि आपली संस्कृतीचा भाग आहे.याचे व्यावसायिक शिक्षण दिले जावे हि सूचना केलीय.

*** सेवापूर्व अभ्यास्क्रमाबत काही सूचना आहेत.
१.      शांततेचे शिक्षण हा विषय शिक्षक अभ्यासक्रमात असावा
२.      अभ्यासक्रम व्यापक असावा
३.      कालावधी वाढवावा.
४.      बालकाच्या निरीक्षणास पुरेशी संधी मिळावी......

अजून एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे “ पंचायत राज” या व्यवस्थेचे सक्षमीकरण पाठ्यक्रमातून करण्याची शिफारस आहे.शाळा ,केंद्र,बीट स्तरावर नेतृत्वगुण विकसित करावेत हि अपेक्षा ठेवलीय.
परीक्षा पद्दतीबाबत देखील विचार मांडलेत.स्मरणावर भर देणारे प्रश्न देण्याऐवजी तार्किकता, नवनिर्मिती,कल्पकता,उपयोजन करणारे प्रश्न असावेत.ताण कमी करण्यासठी श्रेणी असावी असाही सूर दिसतो.
शेवटी शाळा –समाज-शिक्षक या त्रिसूत्री चा अवलंब करावा हीच अपेक्षा आहे.अगोदरच उपलब्ध नवोपक्रमाचे वैश्विकरण करावे असाही पर्याय सुचवलाय.

रणजितसिंह डीसले
बार्शी
7276580113



Comments

Popular posts from this blog

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...