मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.
सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात ? ते.
जानेवारी
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २१
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ६ दिवस ७ तास
|
फेब्रुवारी
एकूण दिवस = २८
कामाचे दिवस = २२
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = १० दिवस २.५० तास
|
मार्च
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २५
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = १४ दिवस ६ तास
|
एप्रिल
एकूण दिवस = ३०
कामाचे दिवस = २५
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ११ दिवस
|
मे
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = १०
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ०
|
जून
एकूण दिवस = ३०
कामाचे दिवस = १६
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = १ दिवस
|
जुलै
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २१
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ५ दिवस ७ तास
|
ऑगस्ट
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २३
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ७ दिवस ६ तास
|
सप्टेंबर
एकूण दिवस = ३०
कामाचे दिवस = २२
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ११ दिवस
|
ऑक्टोबर
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २२
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = १० दिवस ३ तास ३० मिनिटे
|
नोव्हेंबर
एकूण दिवस = ३०
कामाचे दिवस = २४
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = ३ दिवस १ तास
|
डिसेंबर
एकूण दिवस = ३१
कामाचे दिवस = २६
प्रत्यक्ष विना अध्यापन
दिवस = १० दिवस
|
एकूण
दिवस = ३६५
कामाचे दिवस = २३७
विना अध्यापन दिवस = ८९
दिवस
प्रत्यक्ष अध्यापन दिवस
= १४८
|
वरील डायरी व चार्ट
वर एक नजर टाकली असता सहज लक्षात येईल कि अशैक्षणिक कामात शिक्षकांना तब्बल ३८ %
वेळ खर्च करावा लागतोय.दुर्दैवाची बाब अशी कि या अशैक्षणिक कामाचा प्रचंड ताण या
शिक्षकांना सहन करावा लागतोय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार .!!!!
RTE ची अंमलबजावणी
सुरु झाल्यापासून आजतागायत एखादा शिक्षक कलम २४ मधील कर्तव्य पालन करण्यात कसूर
केली म्हणून निलंबित वा शिक्षेस पात्र झाल्याचे उदाहरण स्मरत नाही. याउलट या
अशैक्षणिक कामांमुळे च निलंबित होणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक वाटते.
सरल च्या माध्यमातून
यावर उपाय काढल्याचा दावा प्रशासन करत असले तरी पेपरलेस प्रशासनाची सवय खुद्द
प्रशासनासच नसल्याची उदाहरणे वारंवार समोर येत आहेत..सरल च्या माध्यमातून उपलब्ध माहितीवर
प्रक्रिया करण्याचे कौशल्य प्रशासनास आत्मसात करणे गरजेचे आहे.
वरील sms चे अवलोकन
केले असता अगदी सहज लक्षात येते कि केंद्र प्रमुखांनी मागितलेली सर्वच माहिती सरल
प्रणाली मध्ये उपलब्ध आहे.मग जर ही माहिती सरल प्रणाली मध्ये उपलब्ध असताना ती का मागितली
जाते ? हे न उलगडणारे कोडे आहे.आणि शिक्षक वैतागले आहेत ते या प्रकारांना .
सध्या शिक्षक क्षेत्रात
online चे दोन अर्थ रूढ झालेत. एक म्हणजे माहिती थेट वेबसाईट वर भरणे व भरलेल्या
माहितीची प्रिंट ऑफिसमध्ये देणे. (www.ranjitsinhdisale.blogspot.in )
online व offiline
असे दोन्ही प्रकार एकाच वेळी सुरु असतात. सरल मध्ये माहिती भरली तरी ३० सप्टेंबर
ची जातवार माहिती कागदावर लिहून द्यावीच लागतेय.यामुळे अधिकच त्रासदायक काम वाटते.जि
गत सरल ची तीच शालार्थ ची . online देखील भरा व प्रिंट देखील द्या. अर्थात हे सारे
प्रश्न तंत्रज्ञांनाच्या दैनंदिन वापरातून सहज सुटतात .पण ते सोडवणार कोण? हा
प्रश्न आहे.माहितीवर संस्करण ( data processing and analysis) , माहितीचे संकलन व
पृथ्थकरण ही सारीच कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.
शिक्षकांना अधिक
तंत्र स्नेही बनवण्यासाठी MSCERT ने विशेष नोंदणी मोहीम राबवली. राज्यभरातून खूप
प्रतिसाद देखील मिळाला.अजूनही त्या साठी नोंदणी सुरूच आहे. ही अतिशय उत्साहवर्धक
बाब आहे. मात्र त्या वेबसाईट वर बोटावर मोजता येतील इतक्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण
अधिकारी , शिक्षणाधिकारी ,संचालक ,या अधिकार्यांनी नोंदणी केली आहे.. कागद विरहित
प्रशासन करण्यातील सर्वात महत्वाचे दुवे म्हणजे ही अधिकारी वर्गाची साखळी.पण जर
हेच अधिकारी स्वतः तंत्र स्नेही बनण्यास
उत्सुक नसतील तर सरल च्या माध्यमातून पेपरलेस कामकाज होईल असे मानणे म्हणजे दिवा
स्वप्न ठरेल.कारण वारंवार माहिती मागतात ते अधिकारीच.तेच जर टेक फोबिक झाले तर मग
शेवटी शिक्षकांवरच सर्व जबाबदारी येते.अजूनही वेळ गेलेली नाही . खूप सारे apps ,वेबसाईट
बनवणारे शिक्षक या महाराष्ट्रात आहेत.सारे मिळून तंत्र स्नेही होवुया, शिक्षकांना
शाळाबाह्य कामातून मुक्ती देवूया.
तूर्तास थांबतो
पुन्हा भेटूया
रणजितसिंह
(www.ranjitsinhdisale.blogspot.in )
11/1/2009
जि.प.शाळा , कदम वस्ती येथे रुजू
विना अध्यापन दिवस
|
21 /1/2009
o23/1/2009
कार्यानुभव प्रशिक्षण , टेंभूर्णी
४ दिवस
|
27/1/2009
मुख्याध्यापक मिटिंग, वरवडे येथे दुपारी ३ पर्यंत
|
28/1/2009
पुस्तक प्रदर्शन भेट , मुलांसह
दिवसभर ( टेंभूर्णी
)
|
31/1/2009
केंद्र संमेलन , वरवडे येथे
शनिवार केवळ १ तास अध्यापन
|
10 /2/2009 to
21/2/2009
बाहुली नाट्य प्रशिक्षण , पुणे
१० दिवस
|
25/2/2009
त्रेमासिक प्रपत्रे लेखन
(अर्धा तास )
|
28/2/2009
केंद्र संमेलन , वरवडे येथे
शनिवार केवळ १ तास अध्यापन
|
2/3/2009
पंचायत समिती , कुर्डूवाडी येथे
४ तास विना अध्यापन
|
3/3/2009 to 6/3/2009
भूगोल प्रशिक्षण , सोलापूर
४ दिवस
|
9/3/2009 to
14/3/2009
भूगोल प्रशिक्षण,
टेंभूर्णी
६ दिवस
|
18/3/2009 to
21/3/2009
भूगोल प्रशिक्षण, कुर्डू
४ दिवस
|
28/3/2009
सर्वांगीण गुणवत्ता विकास अभियान अहवाल लेखन
३३ पाने
( २ तास विना अध्यापन )
|
28/3/2009 to 31/3/2009
सहकारी रजेवर असल्याने
१ ली ते ४ थी बहुवर्ग
अध्यापन
४ दिवस
|
2/4/2009 to 4/4/2009
किरकोळ रजा
३ दिवस
|
17/4/2009
विशेष गुणवत्ता चाचणी
१ दिवस
|
21/4/2009 to 28/4/2009
वार्षिक परीक्षा
५ दिवस
|
1/5/2009 to 6/5/2009
निकाल तयार करणे
|
7/5/2009 to 14 /6/2009
उन्हाळी सुट्टी
|
29/6/2009
किरकोळ रजा
१ दिवस
|
7/7/2009
उजळणी चाचणी
१ दिवस
|
14/7/2009
बीट संमेलन , अरण येथे
१ दिवस विना अध्यापन
|
17/7/2009
मुख्याध्यापक मिटिंग , वरवडे येथे ( पूर्ण दिवसभर )
|
24/7/2009
केंद्र संमेलन
१ दिवस
|
29/7/2009
इ. ४ थी प्रशिक्षण,कुर्डूवाडी
१ दिवस
|
3/8/2009
तांदूळ शाळेवर पोहचवणे
(दीड तास)
बँकेत खाते उघडणे , अग्निशमन यंत्र शाळेत पोहचवणे,
शिष्यवृत्ती फॉर्म जमा करणे या कामातच पूर्ण दिवस गेला.
|
8/8/2009
नवीन शाळा नेमणूक
( बदली होवून दुसऱ्या शाळेत रुजू होणे )
यात १ दिवस
|
18/8/2009
वर्ग तपासणी पथक
१ दिवस
|
21/8/2009
दुपारी १ नंतर शिष्यवृत्ती फॉर्म अरण येथे जमा कराण्यात
गेला.
|
22/8/2009
शौचालय तपासणी साठी विस्तार अधिकारी भेट २ तास लावले
भेटीसाठी
केवळ १ तास अध्यापन .
|
27/8/2009 to 30/8/2009
इ.४ थी प्रशिक्षण, कुर्डूवाडी
|
5/9/2009
शिक्षक दिन कार्यक्रम व केंद्र प्रमुख मिटिंग
१ दिवस
|
14/9/2009 to 18/9/2009
चाचणी परीक्षा
५ दिवस
|
19/9/2009 to 22/9./2009
३ दिवस सुट्टी व १ दिवस रजा
|
26/9/2009
.४ थी प्रशिक्षण, कुर्डूवाडी
|
2/10/2009 to 8/10/2009
प्रथम सत्र परीक्षा
७ दिवस
|
10/10/2009 to 21/10/2009
दिवाळी सुट्टी ११ दिवस
|
22/10/2009 to 23/10/2009
.४ थी प्रशिक्षण, कुर्डूवाडी
|
27/10/2009
मोडनिंब येथे EMIS प्रपत्रे भरण्यासाठी १ दिवस
कार्यशाळा
|
29/10/2009
EMIS प्रपत्रे माहिती = ३० मिनिट
स्वयंअध्ययन कार्ड संकलन = २ तास
तांदूळ आणणे व बँक खाते तपासणी = २ तास
दिवसातील एकूण साडे ३ तास विनाआध्यापन
|
Congratulations Sir for your achievement! Winning such an honour on a Global Platform is truly commendable. Hats off to your dedication and continuous efforts to improve our education system
ReplyDelete