Skip to main content

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी
·         साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी  कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले.
गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत राहिली. एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या  तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण पुढे तोट्या गायब होने बंद झाले; कारण आता मोर्चा झाडांकडे वळला होता. गुरुजींनी लावलेली रोपे नष्ट करण्याचा प्रकार सुरु झाला. महिन्याभरात सारी रोपे नष्ट झाली.पण गुरुजींनी देखील हार मानली नाही. पुन्हा नव्याने  रोपे लावतच राहिले.अस म्हणतात ना कि प्रत्येक समस्येवर काळ हाच उपाय असतो ; तस झाल. त्रास देवून गावकरी थकले पण गुरुजी नाही.आपले काम करीतच राहिले.
·         आता २०१५ सालच्या खालील प्रसंगाकडे नजर टाकूया.
साताऱ्याचे एक खासदार ( फोनवरून) : नमस्कार गुरुजी मी खासदार ****** *** बोलतोय.
गुरुजी : बोला सरकार .
खासदार  : माझ्या गावातली ४ पोर तुमच्या शाळेत दाखल करून घेतली नाहीत तुम्ही?
गुरुजी: साहेब , आम्ही बाहेरची मुल घेत नाही.
खासदार : ते काय सांगायचं नाय.पोर पाठवतो . त्यांला admisssion द्या.नायतर..............
गुरुजी: देतो देतो सरकार......


·         आता प्रसंग दुसरा
राज्याचे एक शिक्षण संचालक ( फोनवर) : गुरुजी , माझ्या २ पुतण्यांना तुम्ही दाखल करून     घेतले नाही.
गुरुजी: साहेब, आम्ही बाहेरगावची मुले घेत नाही.
संचालक : ते मला सांगू नका , त्यांना admisssion द्या अन्यथा.........................
गुरुजी : देतो देतो साहेब.
आता वरील दोन प्रसंगाकडे नजर टाकली तर या शाळेत दाखल होण्यासाठी आमदार , खासदार , अधिकारी यांना शिफारस करावी लागते हे तुमच्या लक्षात आलेच असेल.( वरील प्रसंगातील काही आक्षेपार्ह बाबींकडे दुर्लक्ष करावे ही अपेक्षा)
वरील प्रसंगात वारंवार उल्लेख झालेले गुरुजी आहेत--- लोकरे गुरुजी. अन शाळा आहे जि.प. शाळा, निकमवाडी ता.वाई जिल्हा . सातारा.अगदी अचानकच या शाळेला भेट देण्याचा योग आला. जिथ भेटीसाठी केवळ २० मिनिटे द्यावी असा विचार होता त्या शाळेत तब्बल ४ तास रेंगाळत राहिलो.सायंकाळचे ६ वाजले तरी तिथून पाय निघत नव्हता.सातारा म्हटलं कि प्रतिभा ताईच्या  कुमठे बीट ची आठवण येते.मात्र त्याच साताऱ्यात क्रमान्वित अध्ययन पद्धतीने अंशाकडून पूर्णाकडे या तत्वावर आधारित अध्यापन करून लोकरे गुरुजींनी केलेला बदल मात्र अविश्वसनीय आहे. चाकोरी बाहेर जात प्रयत्न करणाऱ्या गुरुजींना यश हमखास मिळते हे पुन्हा एकदा दिसून आले.
अगदी प्रातिनिधिक स्वरूपात या शाळेतील १ ली च्या मुलांची ओळख करून देतो.
एकूण पट: ३०
भाषा विषयातील प्रभुत्व पातळी : पुनरावृत्ती, द्रोणाचार्य, वस्तुनिष्ठ यांसारखे कोणताही अवघड जोड शब्द वाचन, लेखन ही मुले करतात. ( ३० पैकी ३० ह)
चित्रवाचन : मी जेंव्हा एक चित्र दाखवत त्यांना वर्णन करायला सांगितले तेंव्हा सर्वांनी मिळून एकूण 46 शब्द सांगितले.
तुम्ही देखील चकित झाले असाल कि १ ली च्या मुलांना हे कस शक्य आहे? जादा तास घेत असतील गुरुजी? अंगणवाडी पासून तयारी असेल? ३६५ दिवस शाळा असेल? मुले निव्वळ घोकंपट्टी करत असतील? असे जे नानाविध प्रश्न तुमच्या मनात आले असतील  , तर त्यांच उत्तर  ‘नाही’ असेच आहे. आणि १ ली च्या वयातील मुलांना असे अभ्यासचे ओझे नको अस वाटणाऱ्या बालमानसशास्त्र अभ्यासकांनी देखील या शाळेस भेट देवून मुलांची तपासणी करावी. ही मुले ओझ्याने दमली आहेत अस प्रत्यक्ष दर्शनी बिलकुल जाणवत नाही.
सध्यस्थितीतील  सर्व विचार प्रवाहांना छेद देत लोकरे गुरुजीना त्यांची अध्यापन पद्धती विकसित केलीय.मुलांना केवळ अक्षर व अंक ओळख करून न देता त्यांनी मुलांना स्वर –व्यंजन यांतील नातेच उलगडून सांगितले आहे.शब्द तयार करण्यामागील रचना च मुलांना माहितीकरून दिली गेलीय त्यामुळे तर ती मुले अशी अविश्वसनीय कामगिरी करत आहेत.
जी कथा मराठी ची तीच इंग्रजी ची देखील. तुम्हाला माहिती असलेला कोणताही शब्द विचारा ....ती मुल स्पेलिंग सांगणारच . त्यांना फोनेटिक्स ची ओळख करून दिलीय ना. त्यामुळे त्यांना अस कात्रीत पकडण कठीण आहे.तुमचे उच्चार मात्र अचूक असावेत ह   
गणित विषयात मात्र ही चिमुकली तुम्हालाच गोंधळात टाकतील. मी त्यांना खालील संख्या लिहून दाखवायला सांगितली .
सव्वा दोन कोटी
ही संख्या १० सेकंदाच्या आता १३ मुलांनी लिहून दाखवली. अन १ मिनिटामध्ये सर्व ३० जणांनी पूर्ण केली. संख्याशी खेळण्याची कला अवगत झालीय त्यांना. आता या सव्वा दोन कोटी मधील कोणत्याही अंकाची स्थानिक किमंत , दर्शनी किमत ते अचूक सांगतात.या संख्येवर बेरीज, वजाबाकी सारखी मुलभूत गणिती क्रिया ते लीलया करतात.
हे सारंच अदभूत आहे. हा लेख वाचून किती जण विश्वास ठेवतील हे माहित नाही ; पण प्रत्यक्ष भेट घेवून हा अनुभव घ्या. विचार करा अन प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक पाउल टाका.
सर्वाना शुभेच्या.
पुन्हा भेटूया.

रणजितसिंह डीसले , बार्शी.

Comments

  1. ऐकून खूप बरं वाटल जर फोन नंबर मिलाला तर बर होईल कारण मी पण याच मार्गावर आहे। माझी ही कलकलीची विनंती।

    ReplyDelete
  2. S it's true base pakka asel tr mulanna pudhachya gosti samjayal kathin jat nhi mulanna jitak deta yeil titak dil pahije hech tar eka teacher ch kartavya ahe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...