Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

चला भविष्य घडवूया

मायक्रोसॉफ्ट च्या वतीने जगभरातील उपक्रमशील शिक्षकांचे जागतिक संमेलन नुकतेच टोरोन्टो येथे पार पडले. या संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली होती.या परिषदेचा थोडक्यात आढावा.                   ‘एज्युकेशन एक्शचेंज’ हे शिक्षणविषयक जागतिक संमेलन म्हणजे जगभरातील तंत्रस्नेही शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण  उपक्रम जागतिक स्तरावर सादर करण्याचे हक्काचे ठिकाण.मायक्रोसॉफ्ट च्या वतीने  मागील १० वर्षापासून हे संमेलन आयोजित करण्यात येतेय.कॅनडाच्या १५० व्या स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून यजमान पदाचा मान टोरोन्टो ला मिळाला. जगभरातील  ३०० शिक्षकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.भारतातील ८ शिक्षक यासाठी पात्र ठरले,यांपैकी ५ जण या संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होवू शकले. शिक्षकांच्या उपक्रम निवडीची प्राथमिक प्रक्रिया दरवर्षी एप्रिल ते जुलै याकालावधीत पार पडते.यातून निवडले जातात  ते ‘मायक्रोसॉफ्ट इंनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट’. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या शिक्षकांचे देशपातळीवर सादरीकरण घेतले जाते,व देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट उपक्रम जागतिक संमेलनासाठी निवडले जातात.अर्थात ज