Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले प्रती    गिरीश कुबेर (लोकसत्ता)  व राजीव खांडेकर( ABP माझा )        विषय : माध्यमांच्या घटनाविरोधी  वैचारिक असहिष्णुतेबाबत       महोदय ,                         सप्रेम नमस्कार .              आपण दोघेही प्रसार माध्यम क्षेत्रातील बिनीचे मराठी शिलेदार आहात याचा मला सदैव अभिमान असतो.समाजातील प्रत्येक घटनेमागे पाहण्याची दृष्टी आपण देत असता. मात्र मागील काही महिन्यांपासून मी निरीक्षण करतो आहे, आपले विचार स्वातंत्र्य  काहीसे स्वैरपणे उपभोगत आहात असे वाटते.मला एक भारतीय नागरिक म्हणून घटनेने जितके मुलभूत हक्क दिलेत तितकेच ते तुम्हाला देखील दिले गेले असावेत अस मला वाटत.एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घटनेने काही जादा अधिकार दिले असतील तर मला मात्र मला अल्पज्ञानी समजावे.मात्र लोकसत्तेच्या अग्रलेखातून विशिष्ट समाजघटकाला  “ दळभद्री ”,  “ बिनडोक ”  असे विशेषण लावत शाब्दिक आसूड ओढणे हे कितपत संयुक्तिक आहे?याच आठवड्यातील २ घटनांवर तर आपले विचार स्वातंत्र्य  अधिकच स्वैर झाल्याचे जाणवते.पहिली घटना होती शनी शिंगणापूर च