शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला. लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध कसा लावला ? ते कुलकर्णीच जाणोत. केंद्र व राज्य शासनाची कार्यालये ७८ दिवस बंद राहतात. शिक्षकांना त्यात ५२ रविवार वाढवून मिळतात इतकेच. त्याचा इतका बागुलबुवा का करता ? ७९+५२=१३१ दिवस शाळा बंद राहतात. अर्थात १३१ ही सर्वाधिक संख्या आहे.यात दरवर्षी घट होते कारण काही सुट्ट्या रविवारी येतात. मग हा १४५ चा आकडा आला कसा? त्याचे उत्तर द्यावे. पुढे कुलकर्णी असे म्हणतात कि शिक्षकानी आठवड्यात ४५ तास अध्यापन करावे असा कायदा सांगतो. पुन्हा दिशाभूल.कायद्यात 45 hours education activities असा स्पष्ट उल्लेख आहे. अध्यापन कृती मध्ये काय काय करावे ते शिक्षक जाणतात. त्यासाठी वेळोवेळी वरिष्ट निर्देश देतच असतात. आता हे निर्देश कुलकर्णीना कसे कळणार? ते काय शिक्षक आहेत का ? आता जरा एकूण कामकाजाकडे नजर टाकू. कारण शाळा किती दिवस सुरु असतात ? ते कुलकर्णीना माहित नाही ना ! शाळांची वेळ सकाळी १०.०० ते ५.०० अशी एकूण ७ तासांची आहे. त्यात जून , जुलै,ऑगस्ट या महिन्यात ९.३०.ते ५.०० असे कामकाज चालते. या ३ महिन्यातील एकूण सुट्ट्यांचा विचार केला तर या ३ महिन्यात एकूण ९२ दिवसांपैकी ३० दिवस सुट्टी असते.( ९ रविवार + ६ इतर+१५ उन्हाळी सुट्टी ). म्हणजे एकूण ६२ दिवस कामकाज चालते. प्रतिदिन ७.५० तास या हिशोबाने ४६५ तास कामकाज चालते. सप्टेंबर , ऑक्टोंबर , नोवेंबर या ३ महिन्यात १०.०० ते ५.०० अशी वेळ निश्चित केली आहे. एकूण दिवस ९१. सुट्ट्या २९ दिवस.(९ रविवार+२० सुट्ट्या ) यात १० दिवंसाची दिवाळी सुट्टी आहे एकूण कामकाज दिवस ६२ .प्रतिदिन ७ तास या हिशोबाने ४३४ तास कामकाज चालते. डिसेंबर,जानेवारी, फेब्रुवारी. या महिन्यातील एकूण दिवस ९०/९१. एकूण सुट्ट्या १८( १३ रविवार+५ सुट्ट्या.) आहे एकूण कामकाज दिवस ७२ .प्रतिदिन ७ तास या हिशोबाने ५०४ तास कामकाज चालते. मार्च, एप्रिल मे, महिन्यातील एकूण दिवस ९२. एकूण सुट्ट्या ४३ ( १३ रविवार+३० सुट्ट्या.) एकूण कामकाज दिवस ४९ .प्रतिदिन ७ तास या हिशोबाने ३४३ तास कामकाज चालते. आता जर एकूण सुट्ट्यांची संख्या मोजली तर ती १२० होतेय.याचा अर्थ ११ सुट्या कमी झाल्यात. त्याचे कारण काही सुट्ट्या रविवारी आल्यात तर उन्हाळी व दीपावली च्या सुट्ट्यात या वर्षी कपात केलीय. म्हणजेच शालेय कामकाज २४५ दिवस चालतेय.(३६५-१२०) मग कुलकर्णीचा २००-२२० चा आकडा कसा आहे ? ते सांगाच सगळ्यांना. वरील स्पष्टीकरणातून कुलकर्णीनीच्या पुढील विधानांचा फोलपणा लक्षात येईल. . शिक्षकांचा महिन्याचा पगार ज्या कामाच्या आधारे दिला जातो त्या कामकाजातील ६० तास वाया जात आहेत. . प्राथमिक शाळांचे महिन्याला ४८ तास वाया जात आहेत. उलट वरील स्पष्टीकरणातून शिक्षक वार्षिक २४५ दिवस व प्रती दिवस ७ तास या हिशोबाने १७१५ तास वार्षिक काम करत आहेत. भारतातील कामगार कायद्यानुसार ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून घेता येत नाही. मग शिक्षक ७ तास काम करतात तर मग यांच्या पोटात का दुखते? पुढे कुलकर्णीना अध्यापन कशाला म्हणावे ? असा प्रश्न पडलाय. मुळात जर आपण शिक्षण क्षेत्रातील बाबींविषयी लेख लिहित असू तर मग असे बाळबोध प्रश्न पडायला नकोत. तरी पण सांगतोच. “ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कृतींचा संच म्हणजे अध्यापन ” ( संदर्भ: Burner J.S.1960. The Process of Education, Harvard University Press) मग या आवश्यक कृतींमध्ये पाठाची पूर्वतयारी , शैक्षणिक साधनांची निर्मिती,मूल्यमापन,विविध शैक्षणिक अनुभव, यासह अनेक बाबींचा समावेश होतो. त्या इथे मांडणे संयुक्तिक होणार नाही. तो लेखाचा स्वतंत्र विषय आहे. या साऱ्या बाबींची ओळख सेवापूर्व प्रशिक्षणात असते. कदाचित कुलकर्णीनी ते प्रशिक्षण घेतले नसावे. पुढे ते असे म्हणतात कि विदर्भ वगळता महाराष्ट्रात कडक उन्हाळा फारसा नसतो..उन्हाळ्यातील दिवसात शाळेतील व गावातील उन सारखेच असते. दुपारी सुट्टी असल्यामुळे मुले दुपारीच जास्त खेळतात.तेंव्हा शाळा सकाळी भरवू नये. आता शाळा सुटल्यावर मुलानी खेळावे कि झोपावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात शिक्षक काय करणार ?आणि दुसरा मुद्दा म्हणजे कडक उन्हाचा. मुळात जरा या वर्षीच्या तापमानातील नोंदी पहा. सोलापूर कमाल तापमान ४५, औरंगाबाद ४२ उस्मानाबाद ४३ . आता हे काय विदर्भातील जिल्हे आहेत का? इतक्या तापमानात अध्ययन – अध्यापन प्रक्रिया कशी सुरु राहील? दुरून डोंगर साजरे असतात कुलकर्णी . खोट वाटतंय तर अनुभवच घ्या. भर उन्हाळ्यात तुमच्या अकोल्यात महिनाभर शाळा सुरु ठेवा.मग कळेल. शाळा सुरु ठेवणे म्हणजे येरा गबाळ्याचे काम नाही. नेमके कोण आहात कोण तुम्ही.? हवामानतज्ञ, शिक्षणतज्ञ कि लेखनचंबू ? यांना असेही वाटते कि एप्रिल मध्ये परीक्षा संपताच मुलांची खोटी हजेरी लाऊन १५ दिवस केवळ निकाल लावण्यात वाया घातले जातात. परत एकदा धूळफेक. परीक्षा संपल्यावर मुलांची खोटी हजेरी लावतात याचा पुरावा द्या कुलकर्णी नाहीतर विधान मागे घ्या. उचलली जीभ अन लावली टाळ्याला असे चालणार नाही. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला कुलकर्णी.म्हणे खोट्या हजेऱ्या लावतात. मुलांची परीक्षा संपल्यावर शिक्षकांना पुढील कामे असतात. • .पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन तयार करणे. • . गुणपत्रक स्वहस्ते तयार करणे. • . पुढील इयत्तेसाठी शैक्षणिक साधनांची निर्मिती करणे. • .वार्षिक अहवाल १५ विविध नमुन्यात भरून वरिष्ठाना सदर करणे. • वार्षिक लेखा परीक्षण करून घेणे. अशी इतर कामे शिक्षक करत असतात. आता हि कामे म्हणजे काय गोट्या खेळण्याइतके सोपे आहे का ? लक्षात घ्या शिक्षकांची कामे ही पडद्यामागील कलाकारासारखी असतात. मुलांचे यश उठून दिसते पण शिक्षकाची मेहनत कायम दुर्लक्षित राहते. भारताने क्रिकेट चा विश्वचषक जिंकला तेंव्हा खेळाडूंना १ कोटी बक्षीस मिळाले पण प्रशिक्षकास केवळ २५ लाख. भारत जिंकतो तेंव्हा सारेच कौतुक करतात पण संघ हरला कि हौसे-गौसे पण टीका करतात. कुलकर्णीची अवस्था पण अशीच आहे. टीका करावी पण ती वस्तुस्थितीला धरून असावी.शाळेत पाउल पडल्यापासून मुल काही ना काही शिकतच असते. मग ते शिक्षंकाचा नीटनेटकेपणा असो वा पुस्तकातील धडा.सकाळी शाळा भरण्यापूर्वी शिक्षक स्वच्छतेचे महत्व नकळत सांगत असतो. दुपारी सुट्टीत जेवणापूर्वी नामस्मरण करायला, हात स्वच्छ धुवायला शिकवत असतो. शाळा सुटल्यावर उद्या येताना अभ्यास करून या असे सांगतानाच नकळत अभ्यासाची सवय लावत असतो. आज आपल्याला असणाऱ्या अनेक चांगल्या सवयीची मुळे शाळेतच सापडतील.आम्हा शिक्षकांचा एकच हेतू असतो सर्वांगीण विकास. वाढ आणि विकास यात फरक असतो कुलकर्णी . मग शाळा चालतात किती दिवस? या प्रश्नांचे उत्तर आहे शाळा रात्रंदिवस सुरूच असतात. कारण शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. चे समजून घ्या कुलकर्णी. Ranjitsinh Disale onlyranjitsinh@gmail.com/ranjitsinhdisale.blogspot.com
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ ( मराठी अनुवाद) रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे. अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary मांडतोय. प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...
वाह, क्या बात है,सरजी ।
ReplyDeleteअहो कु. तुम्ही एवढ्या शहाणपणाच्या(?) गोष्टी शिक्षकां मुळेच शिकलात.