“ चप्पल घाला
भ्रष्टाचार थांबवा. ”
अरे काय
तुला वेड लागलाय का ? चप्पल आणि
भ्रष्टाचार याचा काय संबंध. आहे हो. कसं
आहे मित्रांनो जर आपले पाय पोळत असतील तर काय करतो आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात
पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो
कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू
चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार
नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत
असतो. पण पाय पोळू लागले म्हणून तो
बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे
कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच
पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे.
आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू
नका तुम्ही अगोदर चप्पल घाला
मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा
भ्रष्टाचार करतो. चला आता आपण समाजातील इतर लोक कसा भ्रष्टाचार करतात ते पाहू. या
लेखमालेसाठी लेखन करताना मला असे जाणवले कि समाजातील कोणताही घटक या भ्रष्टाचार
रुपी राक्षसापासून दूर नाही. आणि जर हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सोपा उपाय .
“ प्रत्येकाने आपला भ्रष्टाचार थांबवा.”
है हा काय उपाय आहे काय ?
हो हाच आहे उपाय. कसा ते पहा.
“ मी
कोणत्याही कामासाठी लाच घेणार नाही. बिना पैश्याची कामे करीन. जी कामे नियमात
आहेत ती करीन.”
ही प्रतिज्ञा कुणी करावी ?
तर सर्व सरकारी नोकरांनी.
मुख्य सचिव , उप सचिव, अप्पर सचिव , अधिषक,संचालक, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी
, ग्रामसेवक. कारण हे लोक नियमात असणारी
कामे पण करत नाहीत.. जर यांनी फक्त नियमातील कामे केली तरी बराच भ्रष्टाचार थांबेल.
सामान्य नागरिकांनी काय
करावे तर
मी कोणाला पण लाच देणार नाही. कारण मी लाच देतो म्हणून तर
ते घेतात ना.
मी बस/रेल्वे/विमान मध्ये तिकीट काढून बसेन. बस मध्ये रोजच प्रवास
करत असेन तर १०% चा पास काढीन.पण
डुप्लीकेट अपंग पास काढणार नाही.कारण या डुप्लीकेट पास मुळे बिचारा वाहक
चालक यांना कमी पगार मिळतो. मी जर तिकीट काढून रोजच प्रवास केला तर मग महामंडळाचे
उत्पन्न वाढेल आणि ते मग यांना जास्त पगार देतील.
मी रेशनकार्ड वर मिळणारे
धान्य खरेदी करीन . कारण मी ते खरेदी करत नाही म्हणून ते मग व्यापारी घेतो आणि
जास्त भावाने विकतो.
मी बँकेत रांगेत उभा राहून
माझे काम करीन .उगाच गोंधळ घालून गर्दीत घुसणार नाही. त्या बँकेत माझा भाऊ असला
तरी मी रांगेतच उभा राहीन. यामुळे काय
होणार तर रांगेत म्हातारी माणसे असतात त्यांना वेळात पैसे मिळतील. मी नियम पाळले
तर त्यांना फायदा होईल . आणि उद्या जेंव्हा मी म्हातारा होईन तेंव्हा मला पण वेळात
पैसे मिळतील. जर मला भविष्यात असे घडवायचे असेल तर मग हे बीज आताच पेरावे लागेल.
मी एक contractor आहे. मी
लाच न देता कामे मिळविण.जरी कामे मिळाली नाही तरी चालेल. पण लाच न देता काम
मिळवीन. कारण मी काम quality चे करीन. यासाठी मी अभियंत्यांना पण लाच देणार
नाही. कारण जर मी रोड चांगला केला तर उद्या मी किंवा माझी मुलगी याच रोड वरून गेली
आणि रोड खराब असेल तर याचे दुष्परिणाम माझ्याच कुटुंबाला भोघावे लागतील. भविष्यात
मला या रोड वरून जाताना खड्डे नसावेत असा रोड करीन.
मी आहे बसचा चालक. मी प्रवास्यांना त्यांचे सुट्टे
पैसे आठवणीने परत करीन. उगाच १ , २ रुपये
खाणार नाही. कारण १, २, रुपयांनी सुद्धा माझ्याकडे एका फेरी माघे बरीच रक्कम गोळा
होते. असा चोरीचा पैसा मला पचणार नाही. ज्या पावलांनी पैसा आला त्याच पावलांनी
जाणार.
मी आहे गटशिक्षणाधिकारी. मी
पैसे न घेता बदल्या करीन. नियम मोडणाऱ्या शिक्षकाना शिक्षा करीन. पण पैसे उकळणार
नाही. जे शिक्षक चांगले काम करतात त्यांनाच उत्कृष्ट शेरा देणार आणि वेतन वाढ
देणार. पैसे घेऊन शेरे देणार नाही. माझी बदली पण पैसे न देताच करीन.
मी आहे बांधकाम खात्यातील
अभियंता. मी कोणतेही contract पैसे न देता
नियमातील अटी पाहूनच देणारं. काम कसे quality
चे होईल ते पाहीन. कारण याच रोड वरून मला जावे
लागेल. खराब रोड मुळे मलाच मान पाठ याचे विकार होतील. पैसे घेऊन आजार विकत
घेणार नाही. मी पैसे घेतले नाही तर
contractor पण काम चांगले करील. माझा आणि देशाचा फायदा.
ही तर आहेत प्रातिनिधिक
उदाहरणे. तुम्ही पण सामील व्हा आणि संपवा हा भ्रष्टाचार !
चांगली कल्पना आहे. Try करून बघायला हरकत नाही.
ReplyDelete