Skip to main content

लोकशाही अमर रहे!


     नमस्कार ! “ IBN माझा “ च्या “ विशेष सवाल “  मध्ये आपले स्वागत. आजचा सवाल आहे            
“ वागळे, खांडेकर गेले कुठे ? ”.
आमचे संपादक वागळे आणि खांडेकर अज्ञातवासात गेल्यामुळे  मी जनतेचा सेवक आमदार क्षी.ठा.नालासोपारकर आपले मन:पूर्वक स्वागत करतो. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी जेलमधून थेट हा कार्यक्रम सदर करत आहे.लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे! अशा घोषणा देतच मी जेल मध्ये आलोय. बरं झाले त्या सूर्यवंशी ला चोपला ते.नाहीतर लोकशाही चा अपमान झाला असता. सारे पोलीस माजलेतच साले.थेट आमदार ची गाडी आडवतात ! काय अक्कल आहे कि नाही.आमदार म्हणजे जनतेचा सेवक,. या जनतेच्या सेवकाने १५० च्या वेगाने गाडी चालवली तर बिघडले कुठे? कुणाला उडवले तर नाही ना? जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी गाडी वेगात चालवावी लागते हे यांना कसे कळणार?. मी तर विधान सभा अध्यक्ष साहेबांकडे अशी मागणी करतो कि मला तर २०० च्या वेगाने गाडी चालवण्याची परवानगी द्या. नाही तर माझ्या मतदारसंघातून माझ्या वर टीका होईल.जनता माझ्या वर नाराज होईल.हि नाराजी परवडणार नाही.माझी एवढी विनंती मान्य कराच. हवी तर वसई ची केळी पाठवतो.
आमचे संपादक बगळे sorry  वागळे आणि खांडेकर यांना आम्ही आमदार मवाली वाटतो काय? आमचे कार्यकर्ते मवाली असतात. त्यांना आम्ही पोसतो,वेळ आली तर त्यांचा गेम करायला पण मागे पाहत नाही.हे सारे काही जनतेसाठी. जरी अजित पवार भर सभेत बघून घेतो असं म्हणाले तरी ते गुंड नसतात. माझे मित्र जितेंद्र आव्हाड गजनी दिसत असले तरी ते मवाली नाहीत. आजवर इतके अपराध केले पण सापडलेत का कधी? नाही न ? मग ते गुंड कसे? अहो रोज सकाळी स्नान करताना गायत्री मंत्र म्हणत कालची पापे आम्ही धूत असतो. त्यामुळे आम्ही पवित्र असतो. मग आम्ही मवाली कसे का ? सांगा वागळे साहेब? जर खांडेकर हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी याचे उत्तर द्यावे. आता त्या API ला आम्ही विधान भवनात चोपला हो बेदम मारला ! का मारला ? अहो जर जनतेच्या सेवाकालाच जर असा बोलतो तर मग जनतेला कसा बोलतो? म्हणून मारला. लोकशाही जिवंत राहावी म्हणून मारला. पण याचा एवढा गाजावाजा करायची काय गरज. रोजच मी अश्या मारामारी करतो. ते फक्त जनतेसाठी.नाहीतरी त्याला आम्ही सुपारी देऊन पाठवलाच असता स्वर्गात.  आता आयताच विधान भवनात सापडलाय म्हणून धुतला हात. मला जनतेचे प्रश्न लगेचच सोडवण्याची सवय आहे. म्हणून त्याला मारले. बर मी मारताना साधासुधा मारत नाही. लाथा बुक्क्या म्हणजे तर किरकोळ हो!  १०-१२  चापटा मारून काय पोट भरते होय म्हणून त्याच्या नरडीचा घोट घ्यावा असे वाटले म्हणून बसलो छातीवर. तर राम ने मध्ये अडवले. अहो राम कदम हा तर माझा लंगोटी यार आहे.संकट काळी मदत करतो तोच खरा मित्र हि म्हण त्याला त्याच्या p.a. ने सांगितली आणि तो आला माझ्या मदतीला . यात काय चूक. अहो हिटलर ने सुद्धा इटली च्या मित्राला मदत केली  मग याने करू नये का? मी तर राम ची शिफारस शांततेच्या नोबेल साठी करणार आहे. रामाने नाही का रावणाचा वध केला. तसाच सूर्यवंशी रुपी रावणाचा वध करून महाराष्ट्र शांत करणार आहोत. माझ्यासारख्या handsom आमदार ला मवाली म्हणू नका जरा नवीन नाव सांगा माझ्या मैत्रिणींना तो शब्दच कळला नाही. असो.
बाकी विधान सभा अध्यक्ष साहेब तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. पवार साहेबांचे गुण आहेत ह तुमच्यात. पुढचे  मुख्यमंत्री तुम्हीच. अटक होऊ नये म्हणून विधान भवनातच थांब असा तुमचा msg  माझ्या inbox मध्ये वेळेतच आंला तोवर मी शेवटची पायरी उतरत होतो. अशा लहान सहन टिप्स देत जावा आम्ही पण आपली सेवा करू. पोलीस ,पत्रकारांना सोडणार  नसल्याची आपली शपथ पूर्ण कराल हीच अपेक्षा. त्या सत्यपाल सिंहानी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी घेतला वसा टाकू नका.कारण बडे बडे शहरो मे छोटे छोटे हादसे होते है !
आज आपण इथेच थांबू. बाहेर भेटायला लोक आलेत.
लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे!
लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे!
लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे!

Comments

  1. थोड्या लोकांनी, थोड्या लोकांकरिता, ब-याच लोकांवर केलेले राज्य म्हणजे लोकशाही. छान मित्रा !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...