Skip to main content

भ्रष्टाचार



चला आपण  सगळे मिळून भ्रष्टाचार करू!


हो ! वाचून जरा विचित्र वाटतंय ना . पण करूनच पाहू ना भ्रष्टाचार. मी तर रोजच करतो. कसा ?
तर मग हे नक्कीच वाचा
 मी आहे एक शिक्षक. मी रोजच शाळेत उशिरा जातो. रजा न मांडताच सुट्टीवर जातो. रजेच्या काळातील पगार साहेबांना लाच देऊन घेतो. शाळेचा अनुदान खर्च बोगस पावत्या जोडून दाखवतो. आणि जर ऑडीट मध्ये घोळ लक्षात आला तर ऑडीटर ला लाच देऊन ते प्रकरण मिटवतो. एखादा अधिकारी  ( केंद्रप्रमुख , विस्ताराधिकारी ) जर कारवाई करतो अशी धमकी देऊ लागला तर मग त्याला पण लाच द्यायची वर ढाब्यावरील जेवण पण  हं.  मग सांगा किती मस्त आहे सरकारी नौकरी.
वाचकहो एका शिक्षकाला एवढाच भ्रष्ट्राचार करता येतो. जरा वेगळ्या बाजूने पहिले तर लक्षात येईल कि या सरकारी व्यवस्थेत जर एखाद्या शिक्षकाने जर प्रामाणिकपणे सेवा करायचे ठरवले तर त्याला जरा कठीणच जाते. पण मी जो भ्रष्टाचार सांगितला आहे तो त्याला करावाच लागतो.. मी काही समर्थन करत नाही पण जर मी तो केला नाही तर मग मला नाहक त्रास सहन करवा लागतो. कसा ते पहा.
मी सरकारी नौकर म्हणून जेंव्हा शिक्षकाची निवड केली काही काळ सेवा केली विना भ्रष्टाचार. पण एके दिवशी विस्ताराधिकारी शाळेत आलाच. सगळे रेकॉर्ड पाहू लागला. मी नवीनच शिक्षक. मला अजून तरी रेकॉर्ड ची पुरेसी माहिती नव्हती पण हा ऐकूनच घेत न्हवता. खराब शेरा लिहून तो गेला. मी तर अजून शिक्षण सेवक होतो. या काळात जर खराब कामाचा शेरा मिळाला तर मग नौकरी गेलीच म्हणून समजा. मी तर घाबरून गेलो. काय करावे? गावातल्या शाळेतील वरिष्ठ शिक्षकाकडे गेलो. त्यांनी मार्ग सांगितला .
५०० रु दे  साहेब वरिष्ठ साहेबाना सांगत नाहीत. मला तो सोपा मार्ग वाटला. मी त्या शिक्षकाकडे पैसे दिले. मग काय कमाल. तो विस्ताराधिकारी मला कधीच वाईट शेरा देत नाही. ट्रेनिंग मध्ये उशीर झाला तरी काहीच बोलत नाही. शाळेला उशीर झाला तरी काहीच बोलत नाही. आहे कि नाय ५०० रु ची कमाल. माझ्या जिवनातील पहिली लाच मी ५०० रु ची दिली. आणि निवांत झालो.
आता जरा वेगळा विचार करू . जर मी त्याला लाच दिली नसती तर काय झाले असते ? सर्वात पहिला धोका माझ्या कामाचा शेरा त्या अधिकाऱ्याने वरिष्ठांना लेखी कळवला असता. मग ते साहेब तो शेरा अजून खराब लिहून सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवणार. आणि तुम्ही जितक्या वर जाता तितक्या वर लाचेची रक्कम वाढत जाते. जे काम मी ५०० रु मध्ये मिटवले ते किमान ५०००० देऊन पण मिटले नसते. जरी समजा एखादा वरिष्ठ अधिकारी प्रामाणिक असेलच तर मी कदाचित यातून सहीसलामत बाहेर पडलो असतो. पण दर वेळी तो विस्ताराधिकारी माझ्यावर डोळे ठेउनच असणार ना. आणि माणूस चूक न करायला काही यंत्र नाही. त्यामुळे दरवेळी त्रास ठरलेला असणारच. आणि ज्या शिक्षकाने मला असा सल्ला दिला तो त्या अधिकाऱ्याचा खास माणूस. तो शिक्षक सगळे हप्ते गोळा करायचा. हे मला नंतर कळले. आणि जरी तुम्ही प्रामाणिकपणे काम केले तरी त्याचा मोबदला मिळेलच याची खात्री नसते. कारण वेतनवाढ पुरस्कार हे केवळ साहेबांच्या खास माणसाला मिळतात. हे मी सरकारी नौकरी बाबत सांगतोय .कंपनीत वेगळी व्यवस्था असेल.जरऑडीटरला लाच दिली नाही तर तो पण हेच करतो.मग यांना लाच मी काय माझ्या खिशातून देतो काय? छे ! बोगस पावत्या जोडून पैसे काढून यांना देतो.  मग सांगा कोणता मार्ग सोपा.
एका शिक्षकाचे मनोगत वाचून धक्का बसला तरी यामुळे महागाई कशी वाढते ते पाहू. जर हा शिक्षक रोजच उशिरा शाळेत जात असेल तर मग मुलांना तो एखादा धडा पटकन शिकूनही संपवत असणार.यामुळे मुलांमध्ये अपेक्षित कौशल्य विकसन होणार नाही. मग कमी कौशल्य प्राप्त मुले पूर्ण क्षमतेने करणार नाहीत. मग ते पण केवळ पाट्या टाकण्याचेच काम करणार.त्यामुळे छुपी महागाई वाढत जाते. असा आहे शिक्षकाच्या भ्रष्टाचाराचा अन महागाई चा संबंध. जरी शिक्षक भ्रष्टाचार कमी पैश्याचा करत असेल तरी नकळत महागाई वाढतच जाते. कारण तो ज्यांना पैसा देतो त्यांची मिळकत वाढतच जाते. आणि त्यांच्या हातात जादा पैसा खेळत राहतो. ते मग बाजारातून अनेक वस्तू विकत घेतात. त्या वस्तूंची मागणी वाढतच जाते. आणि मागणी वाढली कि किमत वाढते. म्हणून म्हणतो चला सगळे मिळून भ्रष्टाचार करू.
To be continue………………….

Comments

  1. ज्वलंत मुद्द्यावर मुळाशी जाण्याचा उत्तम प्रयत्न , आवडला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...