सुटलो रे बाबा सुटलो
तमाम भारतीयांना नमस्कार !
मी सरबजितसिंग बोलतोय. मला खूप खूप पश्याताप होतोय कि मी भारतात जन्माला आलो. जर
मी पाकिस्तानी नागरिक असतो तर ना आज मी भारताच्या जेल मध्ये मस्तपैकी बिर्याणी खात
बसलो असतो. जय हो गांधीजी ! तुमच्या आदर्श्यांवर भारताची महासत्ता होण्याच्या
दिशेने वाटचाल सुरु आहे. अहिसा हे तत्व सोनिया विसरलेल्या नाहीत ह ! गांधीगिरी चा
विजय असो ! तिकडे चीन उद्या दिल्लीपर्यंत येण्याची आपण वाट पाहू. तोवर आपण निषेध
नोंदवणे सुरु ठेउयात. इंग्रज काळात मवाळवादी नेते करत असत ते काम करण्याची आपली
नीती किती कार्यक्षम आहे याचा आपण कधी विचार करणार आहोत ? त्या इटली च्या
नौसैनिकांनी आपलेच जवान मारले आणि वर देशात पळून गेले. त्यांना फाशी देणार नाही
म्हणून त्यानं परत आणले. आता काय त्यांना मरेपर्यंत पोसाय्चेय का?
भारतीयानो चला लवकर मेणबत्त्या घेऊन माझ्या
अंतयात्रेला येणार ना ? आणि हो निषेधाचे फलक पण आणा ह. तुम्ही भारतीय ठेवढेच करू
शकता. एक तर गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य
मिळायला ३० वर्षे उशीर झाला आणि आता या सोनिया गांधी वर विश्वास ठेऊन जर
भारत महासत्ता होणार असे वाटत असेल तर तुम्हाला शुभेच्छा ! मागच्या महिन्यात भारतीय जवानांना मारून टाकले
तरी देखील सोनियाच्या मंत्रिमंडळातील हे शंड मंत्री मुग गिळून गप्प राहीले आणि आता
माझा खून केल्यावर जर याचा केवळ निषेधच नोंदवला जाईल. यापेक्षा काहीच होणार नाही.
कारण कर्नाटक निवडणूक तोंडावर आहे. तिथे प्रचार करायला वेळ हवा न . उगाच कसला गोंधळ घालता. गप्प बसा. मला एक
प्रश्न पडलाय कि भारताची परराष्ट्र नीती
कोणता अधिकारी ठरवतोय.? हे नक्कीच I.F.S आहे न . देशातील नागरिकांचे रक्षण
करावे हे कळत नाही का रे तुला?
एका भारतीय नागरिकाचा खून केला जातो आणि पंतप्रधान केवळ निवेदनच देतात.
राष्ट्रपती प्रणव जि तुम्ही तरी जागे व्हा ? का तुम्ही पण सोनियाने हे पद दिलेय
म्हणून चूप बसणार? हे गप्प बसणार कारण मी काय सेलेब्रेटी नाही सलमान ने दारू पिऊन गाडी चालवत फुटपाथवर २-४ जण
उडवले तरी त्याला आजारपण आहे म्हणून कोर्टात सुद्धा न येण्याची परवानगी देणाऱ्या
न्यायव्यवस्थेवर मी कसा विश्वास ठेऊ. भगवान के घर देर है अंधेर नही अरे पण वाट पाहत माझा जीव गेला ना आता तर सगळा
अंधारच अंधार.. उद्या सुशीलकुमार ( हसमुख कुमार) येतील मला फुले वाहतील टीव्हीवर
थेट दाखवतील . २ दिवस बडबड करतील नंतर सब शांत. अहो ज्या देशात संसदेचे रक्षण
करताना शहीद झालेल्यांना न्याय मिळत नाही तिथे मी तर कीस झाड कि पत्ती ! माझा आणि
फक्त माझाच खून झालाय. हा काय भारताचाच खून नाही. मी स्वर्गात पाकिस्तानी नागरिक
म्हणून नोंदणी केलीय. कारण या देशात जास्त पापे होतात न म्हणून पाकिस्तानी
नागरिकांना स्वर्गात विशेष सोई असतात.
भेटू परत .
खरच आपली परराष्ट्र नीती
अपयशी ठरतेय का? हा मोठा सवाल या निमित्ताने पुढे येतोय. कारण या कामचुकार
नीतीमुळे आपण आपले स्वतंत्र तर गमावणार नाही ना अशी भीती वाटत्तेय.मागील काही
घटनांवर नजर टाकली तर आपण आपल्या शेजारी किती शत्रू निर्माण केलेत लक्षात येईल.
१.
पाक ने आपले जवान मारून
टाकले. आपण केवळ कडक समाज दिली. पाक ला आर्थिक दृष्टीने नामोहरम करू शकतो. पण आमचे
शरद पवार साहेबच जर किकेट खेळाचे आयोजन करत असतील काय करावे?
२.
श्रीलंकेच्या विरोधातातील
ठराव युनोत आला त्यावेळी आपण ठरावाच्या बाजूने मतदान केले . परिणामी तो देश नाराज
झाला. आणि आणखी दुरावा वाढला. आता तो त्या देशाचा अंतर्गत मामला आहे. आपण त्यात
नाक खुपसू नये. पण तरीही आपण अमेरिकेला जवळ मानले आणि लंकेला दूर लोटले. उद्या
आपल्यावर हल्ला झाला तर काय अमेरिका येणार नाही मदतीला. राष्ट्रहिताला सर्वोच्च
प्राधान्य असावे. आर्थिक विकास साधण्यासाठी राष्ट्रहिताला मातीमोल समजू नका.
शेजारी केवळ मित्रच असावेत. भारताच्या या कृतीमुळे लंका चीन च्या जवळ जाऊ पाहतेय.
ते धोकादायक आहे.
३.
तिकडे बांगलादेश धुमसतोय.
विरोधी पक्षाने आपल्या राष्ट्रपती ना भेट नाकारली . आणि आपण अजून पण ते गंभीरपणे
घेतच नाही.
४.
चीन तर २०-२० किमी आपल्या
सीमेत येतो आणि आपण केवळ निषेधच नोंदवत राहतो. चीन ने आजवर सीमा प्रश्नी रशिया
तिबेट अफगाण यांना पराभूत केलेय आणि ते आता आपल्यावर चाल करून आहेत. पण लक्षात
घ्या ते आपल्यावर हल्ला करूच शकत नाहीत कारण त्यांची १२% बाजारपेठ आपणावर अवलंबून
आहे. ते केवळ भीती दाखवत आहेत. १९६१ चा पराभव किती दिवस मनात ठेवायचा. जरा हटके
सोचो. चीनच्या सीमेत करा न अतिक्रमण. ते काही १२ महिने हिमालयात थांबत नाहीत.
त्यांना आजवर सव्वा शेर भेटला नाही म्हणून इतके धाडस करतात. पण त्यांची मुसकी आपण
बांधू शकतो हे जरा दाखऊन द्या ना.
५.
परराष्ट्र नीती ची रचना
बदला. देशहित महत्त्वाचे.केवळ प्रादेशिक पक्ष नाराज होतील म्हणून देश हित कमी लेखू
नका नाहीतर असे किती तरी सरबजीत बळी जातील.
बरोबर आहे मित्रा तुझं.पण लक्षात कोण घेतो?देशात कर्तेपणा पेक्षा नाकर्तेपणा वाढला आहे.देशात केवळ सरकार काहीही करू शकत नाही.नागरिकांचीही काही कर्तव्ये असतात.मला तर हा देशच माझा वाटेनासा झाला आहे.
ReplyDelete