“ अनेकवेळा एमपीएससी देण्याऱ्या गरीब मुलाचे काही अजाण प्रश्न ” अखेर एम.पी.एस.सी. ने परीक्षा पुढे ढकलली. मुळात परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्याने बदल करणे हे एम.पी.एस.सी चे वैशिट्य आहे. मागील वर्षातील परीक्षाचे वेळापत्रक पहिले तर लक्षात येते कि PSI , STI , ASST, MPSC या परीक्षा नियोजित वेळापत्रकात बदल करूनच घेतल्या आहेत. मग यावेळी परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. वेळापत्रक न पाळणे , वेब साईटवर व्हायरसचा हल्ला होणे हि तर बेजबाबदार कामाची पावती आहे. एक नजर टाकू अशाच कारभारावर. मुळात एम.पी.एस.सी ने सर्व बदल यूपीएससी च्या धर्तीवर स्वीकारले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात जसा यूपीएससी ने गोंधळ माजवला तसा गोंधळ आपण पण घालू असे जर एम.पी.एस.सी वाटले तर चुकीचे नसावे. यूपीएससी चे बदल १. ...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.