कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले प्रती गिरीश कुबेर (लोकसत्ता) व राजीव खांडेकर( ABP माझा ) विषय : माध्यमांच्या घटनाविरोधी वैचारिक असहिष्णुतेबाबत महोदय , सप्रेम नमस्कार . आपण दोघेही प्रसार माध्यम क्षेत्रातील बिनीचे मराठी शिलेदार आहात याचा मला सदैव अभिमान असतो.समाजातील प्रत्येक घटनेमागे पाहण्याची दृष्टी आपण देत असता. मात्र मागील काही महिन्यांपासून मी निरीक्षण करतो आहे, आपले विचार स्वातंत्र्य काहीसे स्वैरपणे उपभोगत आहात असे वाटते.मला एक भारतीय नागरिक म्हणून घटनेने जितके मुलभूत हक्क दिलेत तितकेच ते तुम्हाला देखील दिले गेले असावेत अस मला वाटत.एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घटनेने काही जादा अधिकार दिले असतील तर मला मात्र मला अल्पज्ञान...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.