माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साध...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.