Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’ प्रयोग @ @ रणजितसिंह डिसले

                                      ब्राझील म्हटले कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे  आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल  २०१६ मध्ये या देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.                                       सेंट लुईस हा अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोक...