चला आपण सगळे मिळून भ्रष्टाचार करू! हो ! वाचून जरा विचित्र वाटतंय ना . पण करूनच पाहू ना भ्रष्टाचार. मी तर रोजच करतो. कसा ? तर मग हे नक्कीच वाचा मी आहे एक शिक्षक. मी रोजच शाळेत उशिरा जातो. रजा न मांडताच सुट्टीवर जातो. रजेच्या काळातील पगार साहेबांना लाच देऊन घेतो. शाळेचा अनुदान खर्च बोगस पावत्या जोडून दाखवतो. आणि जर ऑडीट मध्ये घोळ लक्षात आला तर ऑडीटर ला लाच देऊन ते प्रकरण मिटवतो. एखादा अधिकारी ( केंद्रप्रमुख , विस्ताराधिकारी ) जर कारवाई करतो अशी धमकी देऊ लागला तर मग त्याला पण लाच द्यायची वर ढाब्यावरील जेवण पण हं. मग सांगा किती मस्त आहे सरकारी नौकरी. वाचकहो एका शिक्षकाला एवढाच भ्रष्ट्राचार करता येतो. जरा वेगळ्या बाजूने पहिले तर लक्षात येईल कि या सरकारी व्यवस्थेत जर एखाद्या शिक्षकाने जर प्रामाणिकपणे सेवा करायचे ठरवले तर त्याला जरा कठीणच जाते. पण मी जो भ्रष्टाचार सांगितला आहे तो त्याला करावाच लागतो.. मी काही समर्थन करत नाही पण जर मी तो केला नाही तर मग मला नाहक त्रास सहन करवा लागतो. कसा ते प...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.