Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

थेट शिक्षण अनुदान हस्तांतरण योजना:: कितपत व्यवहार्य

पाश्च्यात्य देशाच्या कल्पनांचे अंधानुकरण करणारी अजून एक पद्धत हेरंब कुलकर्णी यांनी आज  लोकसत्तेत मांडलीय. आपण आपल्या देशात कायम इतर देशांचे अनुकरण करत ज्या ज्या योजना राबवण्याचा प्रयत्न केलाय ते सर्व फोल ठरलाय. या योजना राबवण्याने आणि परत त्या बंद करण्याने मुलांचे खूप नुकसान होते. आपण आपले देशी पर्याय सोडून का बरे इतर पर्याय वापरण्याचा आग्रह धरतो? अनेक देश मुलांना परीक्षेत नापास करत नाहीत तिथे ग्रेड पद्धत आहे म्हणून आपण पण अनुकरण केले. त्याची फळे कडू लागली कि लगेच ते बंद केले.  शिक्षणाची महान परंपरा असणारा आपला देश अशा कल्पना का अंगीकारतो तेच कळत नाही.आता तर व्हावचरपद्दत. आता या व्हावचर पद्धती विषयी जरा सविस्तर जाणून घेवू. सन १८६९ मध्ये या पद्धतीचा पहिल्यांना उगम झाला. १९१७ साली नेदरलँड्स ने सर्वप्रथम वापर केला.पुढे १९६० मध्ये द. ऑस्ट्रेलिया ने वापर सुरु केला. १९८६ साली चिली ने वापर सुरु केला. पुढे अमेरिकेने पण अनुकरण केले. आणि २००६ साली पाकिस्तान ने हि पद्धत अवलंबली.या सर्व देशांमध्ये फक्त नेदरलँड्स हा एकमेव देश आहे ज्याने शाळेतील मुलांची उपस्थिती वाढावी म्हणून हि पद्धत व...