नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या वतीने EDUCATION FOR ALL या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद द.कोरियातील इंचोन येथे आयोजित करण्यात आली होती. सन २००० साली सेनेगल मधील डकार येथील परिषदेत निश्चित केलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेत पुढील १५ वर्ष्यान्साठी जागतिक उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी या परिषदेत मंथन करण्यात आले. याला अनुषंगून सन २००० ते २०१५ या कालावधीत जागतिक स्तरावर शिक्षण व्यवस्था किती प्रगत झाली आहे?? याचा उलगडा करणारी ही टिपणी..... युनेस्कोने सर्व राष्ट्रांना मागर्दर्शक असा कृती आराखडा पुढील ६ कलमांवर मांडला आहे. १. पूर्व प्राथमिक शिक्षण व बालकांची आरोग्यविषयक काळजी २. प्राथमिक शिक्षण ३. युवकांचे कौशल्य विकसन ४. प्रौढ शिक्षण ५. गुणवत्तापूर्ण शिक्षण ६. लैंगिक सक्षमता व समानता. या क्षेत्रात भारताने मागील १५ वर्षात केलेली कामगिरी पाहणे गरजेचे वाटते. ...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.