Skip to main content

ओझे नेमके कशाचे????????????????

       ओझे नेमके कशाचे????????????????  Ranjitsinh Disale
महाराष्ट्रातील तमाम शाळकरी मुलांच्या पाठीवर भौतिक सुविधांचे ओझे आहे कि बोजड आशयाचे ओझे आहे? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उकल म्हणून समितीची स्थापना झाली.या समितीने आपला अहवाल देखील दिला.मात्र या समितीने १९९३ साली प्रो.यशपाल यांनी सादर केलेल्या ओझ्याविना अध्ययन या अहवालाचा जराही विचार केल्याचे जाणवत नाही.१९९३ सालच्या या अहवालात आताच्या समस्येवर ५ सूत्री उपाय सुचवल आहेत(वाचा.www.ranjitsinhdisale.blogspot.in)
ज्याचे प्रतिबिंब ncf 2005 मध्ये उमटले आहे.मात्र याकडे राज्य शासनाच्या समितीने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.कदाचित समितीला केवळ भावनिक उपाय सुचवायचे असावेत.कारण ज्या शिफारशी सुचवल्या आहेत त्या अशात्रीय आहेत,असे वाटते.
मुळात आशयाचे ओझे आहे तरी काय? किती आहे आशयाचे ओझे? या प्रश्नांची उकल या लेखातून करून घेवूयात.जर १ ली ते ४ थी च्या पाठ्यपुस्तकावर नजर टाकली तर पुढील निरीक्षणे मी नोंदवली आहेत.
१ ली चे मूल  वर्ष्यातील साधारण २२०-२४० अध्यापन दिवसात मराठी,गणित व इंग्रजी या ३ विषयातील एकूण ११८ उप घटक २४० पानांमधून शिकते.
२ री चे मूल तेवढ्याच दिवसात त्याच ३ विषयातील ११६ उप घटक २५० पानांमधून शिकते.
३ री चे मूल ७५ उप घटक ४१४ पानांमधून शिकते
४ थी चे मुल ९१ उप घटक ४९० पानांमधून शिकते.
वरील नोंदींमध्ये कला,कार्यानुभव ,शारीरिक अभ्यास या विषयांचा समावेश नाही. तो केला तर अजून वाढ होईल आशयामध्ये. आता वरील सर्व उप घटक केवळ शिकायचे नाहीत तर त्याचे दृढीकरण ,सराव व मूल्यमापन या देखील कृती गरजेच्या आहेत.
आता या आशयाचा बोजडपणा लक्षात आला असेल. मात्र याकडे दुर्लक्ष केलेय समितीने.या अशायाच्या ओझ्याखाली बालक दबून न गेल्यास नवलच. हे ओझे कमी करायला हवे.मात्र रोग म्हशीला अन औषध पखालीला असा प्रकार दिसतो.या समितीला आशयाच्या बोजडपणा घालवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने लाभली होती.मात्र ती व्यर्थ गेली याचे दुख आहे.
आता एक नजर टाकू समितीच्या शिफारशींवर.
राज्य शासनाने नेमलेली ही समिती नेमकी कोणत्या अभ्यासक्रम मंडळाला शिफारशी देणार ? याबाबत गोंधळ आहे असे वाटते. कारण समितीने तिच्या अहवालात असे निरीक्षण नोंदवले आहे कि – “ राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा CBSC,ICSE या मंडळाच्या शाळांमधील मुलांच्या दप्तराचे ओझे जास्त असते.” मग असे असेल तर मग सरकार CBSC बोर्डाला साधे पत्र लिहून याची कल्पना देवू शकते असते ना. त्या मंडळाने यावर उपाययोजना करायला हवी.आणि शिफारशी मात्र आहेत राज्य मंडळाला. आता बालभारतीने पुस्तके सत्रावार छापावी अशी शिफारस केलीय.हा विरोधाभास नाही का? थोडक्यात काय तर समस्या आहे CBSC बोर्डाच्या शाळांची अन उपाय मात्र राबवायचे बालभारतीने!!!!!!!!!! या समस्येआड सरकार आता बालभारती सोबतच CBSC शाळांवर वर पण अंकुश ठेवू पाहतेय कि काय असे ही वाटते..
पुस्तके एकत्रित करावी,
सत्र वार छपाई करावी ,
छपाई चा कागद बदलावा
एकच वही आणायला लावावी.
अशा स्वरुपाय्च्या सूचना आहेत.
जर याची अंमलबजावणी झालीच तर मग ते शिक्षण शास्त्राच्या विरोधात असेल असे वाटते. कारण बालभारती काय किंवा इतर अभ्यासक्रम मंडळे पाठ्यपुस्तकाची रचना ही समकेंद्री पध्दतीने करतात. आशय देखील तसाच मांडला जातो. तसेच परस्पर समवाय देखील त्यात साधलेला असतो. मग इतकी शास्त्र शुध्द रचना का बदलावी? याचे कोणतेही कारण अहवालात नाही..............................
रणजितसिंह iDsalao
7276580113

.

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...