१० वी च्या “असर”दार निकालाचे ‘कुबेरी” विश्लेषण दरवर्षी प्रमाणे १० वी चा निकाल घोषित झाला. आपल्या मुलानी गुणवत्तेचे झेंडे अटकेपार लावले.सर्वप्रथम अभिनंदन करतो मी या सर्व मुलांचे. आज लेखनाचा विषय मात्र वेगळा आहे. निकालाच्या दिवशी एक मेसेज whatsapp वर फिरत होता.तो असा ५ वी च्या मुलांना बेरीज येत नाही ६ वी ची मुले भागाकार करत नाहीत. ८ वी च्या मुलांना तर वाचता येत नाही असा अहवाल देणारी संस्था शोधून काढा रे.............. हा मेसेज वाचल्यावर असे जाणवले कि ही शिक्षक लोकांची तात्कालिक भावना आहे. किंवा प्रथम कारांचे निक्ष्कर्ष चुकीचे ठरले याचा त्यांना आनंद झाला असावा.मात्र दुसऱ्या दिवशी लोक-मान्य लोक-शक्ती असे बिरूद मिरवणाऱ्या फुटकलांनी तर आम्हाला यांची काळजी वाटते असे कुबेरी विश्लेषण केले.याना अजून जाग आलेली दिसत नाही. विधानसभेत झालेला निषेध विसरलात कि काय???. गरीब शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या कि यांना ते नाटक वाटते; आमच्या मुलांनी मेहनतीने यश मिळवले कि यांना काळजी वाटते... त्या सबंध लेखात कुठेही मुलांचे साधे अभिनंदन केले नाही.या कोत्या कुबेरी मनोवृत्तीची क...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.