१० वी च्या “असर”दार निकालाचे ‘कुबेरी” विश्लेषण
दरवर्षी प्रमाणे १० वी चा
निकाल घोषित झाला. आपल्या मुलानी गुणवत्तेचे झेंडे अटकेपार लावले.सर्वप्रथम अभिनंदन
करतो मी या सर्व मुलांचे. आज लेखनाचा विषय मात्र वेगळा आहे. निकालाच्या दिवशी एक
मेसेज whatsapp वर फिरत होता.तो असा
५ वी च्या मुलांना बेरीज
येत नाही
६ वी ची मुले भागाकार करत
नाहीत.
८ वी च्या मुलांना तर वाचता
येत नाही
असा अहवाल देणारी संस्था
शोधून काढा रे..............
हा मेसेज वाचल्यावर असे
जाणवले कि ही शिक्षक लोकांची तात्कालिक भावना आहे. किंवा प्रथम कारांचे निक्ष्कर्ष
चुकीचे ठरले याचा त्यांना आनंद झाला असावा.मात्र दुसऱ्या दिवशी लोक-मान्य
लोक-शक्ती असे बिरूद मिरवणाऱ्या फुटकलांनी तर आम्हाला यांची काळजी वाटते असे कुबेरी विश्लेषण केले.याना अजून जाग
आलेली दिसत नाही. विधानसभेत झालेला निषेध विसरलात कि काय???. गरीब शेतकऱ्यांनी
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या कि यांना ते नाटक वाटते; आमच्या मुलांनी
मेहनतीने यश मिळवले कि यांना काळजी वाटते... त्या सबंध लेखात कुठेही मुलांचे साधे
अभिनंदन केले नाही.या कोत्या कुबेरी मनोवृत्तीची कंपा वाटावी.याचा एक अर्थ असाही
होतो कि हे माध्यम आता केवळ नकारात्मक विचार करणार.समाजाला दिशादर्शक विचार ते मांडू शकतील का??? हा लेख
प्रकाशित झाला आणि सर्वत्र चर्चा सुरु झाली वाढीव गुणवत्तेची....
मात्र वाचक हो या
वृत्तपत्राने अतिशय चपलख पणे मूळ मुद्द्याला बगल दिलीय.याच वृत्तपत्राचा १४
जानेवारीच्या अंकात सर्व फज्जा अभियान या शीर्षकाखाली प्रथम कारांचे अजब निष्कर्ष
सविस्तर सांगितलेत.सुरवातीला या वाढीव गुणवत्तेचे जे चित्र निर्माण केलेय ते कसे
चुकीचे आहे ते सांगतो.
एखाद्या परीक्षेत इतके
भरमसाट विध्यार्थी पास होत असतील तर तशा परीक्षेचा दर्जा हा प्रश्नांकित होतो? असे
कुबेरी विधान त्या लेखात आहे. आता मुळात १० वी च्या परीक्षेत किती मुले पास झालीत
याची आकडेवारी घेतली तर लक्षात येईल कि २०१४ च्या तुलनेत ६९१२६ मुले अधिक उत्तीर्ण झालीत.आता हा आकडा भरमसाट या काल्पनिक संबोधाशी
कितपत जुळतोय हे तुम्हीच ठरवावे.कारण २०१५ साली दरवर्षी प्रमाणे नोंदणी करणाऱ्या
मुलांची संख्या देखील वाढलेलीच आहे.एखाद्या परीक्षेचा दर्जा हा त्यात उत्तीर्ण
होणाऱ्या मुलांच्या संख्येवरून लावण्याचे अजब तर्क कोणी लावला ते कळेल का?? म्हणजे
जर उद्या १० वी चा निकाल २०१५ च्या तुलनेत कमी लागला तर मग हीच मुद्रित माध्यमे १०
वी च्या परीक्षेचा दर्जा सुधारला असे म्हणणार का??१० वी ची परीक्षा ही एका विशीष्ट
स्तरावरील मुलांचे लेखी मूल्यमापन अधिक प्रमाणात करणारी परीक्षा आहे. शिक्षण
क्षेत्रात कायमच एक स्पर्धा समांतर सुरु असते. ती स्पर्धा असते मूल्यमापन कर्ते व
मूल्यमापन करून घेणारे यांच्यात. या स्पर्धेचा आजवर चा इतिहास पाहिला तर असे
लक्षात येते कि सुरवातीच्या टप्प्यात मूल्यमापन कर्ते यात आघाडी घेतात ..त्यामुळे
परीक्षेचा निकाल कमी लागत असतो...मात्र जशी वर्षे सरतात तशी या स्पर्धेत मूल्यमापन
करून घेणारे आघाडी घेतात...मात्र या दोघांपैकी कोणत्याही एका चे वर्चस्व अधिक काळ
राहणार नाही याची दक्षता धोरणकर्ते घेत असतात.आता १० वी च्या परीक्षेवर मूल्यमापन
करून घेणाऱ्यांचे वर्चस्व आहे.एका विशिष्ट पातळी पर्यंत हे वर्चस्व राखले जाईल.आणि
परत मग धोरणकर्ते ही स्पर्धा नव्याने सुरु करतील.कारण समतोल महत्वाचा असतो.
१० वी च्या निकालची २०१४ च्या निकालाशी तुलना केली असता असे दिसून
येते कि ४५% -ते ७५ % गुण मिळवणारे
विध्यार्थी प्रमाण हे घसरले आहे.आणि सर्वाधिक मुले याच टप्प्यात असतात.अधिकच
विस्तृत हवे असेल तर सांगतो ४५ ते ६० या टप्प्यात -३.०४ नी संख्या कमी झालीय.६० ते
६५ % गुण घेणारे संख्या -०.८६ ने कमी झालीय.६५ ते ७० % गुण घेणाऱ्यांची संख्या
-०.४५ ने कमी झालीय.तर ७०-७५ % गुण
घेणाऱ्यांची संख्या -०.०७ ने कमी झालीय.आणि हाच गट निकालावर जास्त परिणाम करतो.मग
निकाल वाढीचा सर्वाधिक फायदा कोणी घेतलाय तर तो ३५% ते ४५ % गुण मिळवणारे
मुलांनी.यांनी ३.०९% ची वाढ नोंदवली आहे.यामागील कारण कदाचित वाढीव २० गुण असतील
किंवा मग या टप्प्यातील मुलांनी मेहनत जास्त केली असेल.७५ % ते १००% या गटाने
मात्र आपली नैसर्गिक वाढ कायम राखलीय. मग जर एखाद्या परीक्षेच्या निकालवर सर्वाधिक
परिणाम करणाऱ्या मुलांच्या संख्येत घटच झाली असेल ; हुशार समजल्या जाणऱ्या मुलांची
संख्या पण कायम असेल तर मग तर मग काळजी नेमकी कशाची वाटतेय????????????? इतकेच काय
तर मराठी व गणित या विषयात उत्तीर्ण होणार्यांची टक्केवारी घसरलीय; व इंग्रजी
विषयातील उत्तीर्ण प्रमाण मात्र ३ % वाढलेय.हे सर्व कॉपी मुक्त अभियान सुरु असताना
आहे....त्यामुळे काळजी वाटण्याजोगी निकालाची टक्केवारी अजून तरी वाढलेली नाही कारण
मूल्यमापन कर्ते आता पडद्यामागून कृतीशील झालेत.
दुसरे एक असमर्थनीय विधान
म्हणजे शासनाला खरे तर १००% निकाल लावण्याची इच्छा आहे. आता या विधानामागील नेमके
कोणते मानसशास्त्रीय तत्व आहे ते मात्र सांगितले नाही. आता संपादक महोदय
दुसऱ्याच्या मनातील इच्छा ओळखणारी क्लुप्ती शिकलेत कि काय???आम्हालाही सांगा
दुसऱ्याच्या मनातील इच्छा ओळखण्याची क्लुप्ती?????????
आता ज्या मूळ मुद्द्याला
बगल देण्यात आलीय त्याकडे वळूया.माझ्या मनात प्रश्न आहे कि १० वी चा निकाल खरा
मानावा कि प्रथम कारांचा अहवाल खरा
मानावा???? का हे दोन्ही पण खरे मानावेत??या ३ प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतील. जर
याचा शोध घेणारा लेख लिहिला असता तर मग काळजी वाटली नसती.
सुरवातीला आपण आकडेवारी
पाहू या.
प्रथम कारांचा चा २०१३ चा अहवाल वाचला तर असे लक्षात येईल कि
२१% ८ वी
ची मुले मराठी चे पहिलीच्या दर्जाचे वाचन करतात.
आणि आता हीच मुले जेंव्हा
२०१५ साली १० त गेलीत तर १० वी च्या मराठी विषयाचा निकाल ९३ % आहे. हा विरोधाभास
काय सांगतो?????????????
प्रथमकरांच्या च्या मते २०१३ साली ३३.८ % मुले भागाकार करत होती.
आता हीच मुले १० वीत गेलीत
तर मग १० वी च्या गणित विषयाचा निकाल ९०.३४ % आहे.
याचा अर्थ कुठे तरी गफलत
होत आहे.
एक तर प्रथम कार धूळफेक
करतायेत किंवा मग सरकारी यंत्रणा तरी???हे तपासणारे नेमके कोण आहेत याचाशोध घेतला असता भयाण वास्तव समोर आलेय.आमच्या
सोलापूर मध्ये अक्कलकोट चा संतोष गुरव नावाचा बी.ए. मुलगा प्रथम मध्ये वाचन-लेखन
गणित विभागाचा जिल्हा प्रमुख आहे.त्याच्या टीम कडून असा अहवाल दिला जातो. याउलट १०
वी चे पेपर हे त्या विषयाचे तज्ञ शिक्षक तपासतात. त्यांची फेर तपासणी मॉडरेटर
करतात. त्यावर चीफ मॉडरेटर असतात. अशी
सरकारी यंत्रणा आहे.तसेच आता उत्तरपत्रिका प्रत देखील मिळते. अशी संपूर्णपणे
पारदर्शक यंत्रणेवर विश्वास ठेवावा कि संतोष गुरव च्या टीम वर. आता हे वास्तव मी
नव्याने मांडतोय असे नव्हे. हे वास्तव तर
उघड आहे. माझा मुद्दा हा आहे कि हे वास्तव डोळेझाक करून सर्व फज्जा अभियान अशा
शीर्षकाखाली बातमी देणार्यांनी जनतेची दिशाभूल करत मूळ मुद्द्याला बगल का दिली???
वर यांचा दावा असा ही असतो कि आम्हाला माध्यम स्वातंत्र आहे. मुळात घटनेंत माध्यम
स्वातंत्र नाहीच. विचार स्वातंत्र्य आहे. आणि सर्वच स्वातंत्र्यावर एक बंधन असे
आहे कि दुसऱ्याचे स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेवून तुमचे स्वातंत्र्य उपभोगू शकत
नाही.माझा असा दावा आहे कि या माध्यमांनी मांडलेल्या विचारामुळे माझ्या विचार
स्वातंत्र्यावर गदा आली आहे.याउलट एक तटस्थ पक्ष म्हणून भूमिका लिहायला हवी होती.
मात्र केवळ गुणवत्ता वाढलीय असा प्रचार करून बगल देणे कितपत व्यवहार्य आहे???म्हणजे
तुम्ही कायमच नकारात्मक लिहिणार असाल तर ...मग नाईलाज आहे.इथेच थांबतो................पुन्हा
भेटूया.
रणजितसिंह डिसले,बार्शी
Comments
Post a Comment