प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी www.ranjitsinhdisaleblogspot.in · साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले. गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत राहिली. एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या ...