प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी....www.ranjitsinhdisale.blogspot.in
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी
www.ranjitsinhdisaleblogspot.in
· साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले.
गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता
तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत राहिली. एक वस्तू गायब
झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण पुढे
तोट्या गायब होने बंद झाले; कारण आता मोर्चा झाडांकडे वळला होता. गुरुजींनी
लावलेली रोपे नष्ट करण्याचा प्रकार सुरु झाला. महिन्याभरात सारी रोपे नष्ट झाली.पण
गुरुजींनी देखील हार मानली नाही. पुन्हा नव्याने रोपे लावतच राहिले.अस म्हणतात ना कि प्रत्येक
समस्येवर काळ हाच उपाय असतो ; तस झाल. त्रास देवून गावकरी थकले पण गुरुजी नाही.आपले
काम करीतच राहिले.
· आता २०१५ सालच्या खालील प्रसंगाकडे नजर टाकूया.
साताऱ्याचे एक खासदार ( फोनवरून) : नमस्कार गुरुजी मी खासदार ******
*** बोलतोय.
गुरुजी : बोला सरकार .
खासदार : माझ्या गावातली ४
पोर तुमच्या शाळेत दाखल करून घेतली नाहीत तुम्ही?
गुरुजी: साहेब , आम्ही बाहेरची मुल घेत नाही.
खासदार : ते काय सांगायचं नाय.पोर पाठवतो . त्यांला admisssion द्या.नायतर..............
गुरुजी: देतो देतो सरकार......
· आता प्रसंग दुसरा
राज्याचे एक शिक्षण संचालक ( फोनवर) : गुरुजी ,
माझ्या २ पुतण्यांना तुम्ही दाखल करून घेतले
नाही.
गुरुजी: साहेब, आम्ही बाहेरगावची मुले घेत नाही.
संचालक : ते मला सांगू नका , त्यांना admission द्या अन्यथा.........................
गुरुजी : देतो देतो साहेब.
आता वरील दोन प्रसंगाकडे नजर टाकली तर या शाळेत दाखल होण्यासाठी आमदार
, खासदार , अधिकारी यांना शिफारस करावी लागते हे तुमच्या लक्षात आलेच असेल.( वरील
प्रसंगातील काही आक्षेपार्ह बाबींकडे दुर्लक्ष करावे ही अपेक्षा.www.ranjitsinhdisale.blogspot.in)
वरील प्रसंगात वारंवार उल्लेख झालेले गुरुजी आहेत--- लोकरे गुरुजी. अन
शाळा आहे जि.प. शाळा, निकमवाडी ता.वाई जिल्हा . सातारा.अगदी अचानकच या शाळेला भेट
देण्याचा योग आला. जिथ भेटीसाठी केवळ २० मिनिटे द्यावी असा विचार होता त्या शाळेत
तब्बल ४ तास रेंगाळत राहिलो.सायंकाळचे ६ वाजले तरी तिथून पाय निघत नव्हता.सातारा
म्हटलं कि प्रतिभा ताईच्या कुमठे बीट ची
आठवण येते.मात्र त्याच साताऱ्यात क्रमान्वित अध्ययन पद्धतीने अंशाकडून पूर्णाकडे या
तत्वावर आधारित अध्यापन करून लोकरे गुरुजींनी केलेला बदल मात्र अविश्वसनीय आहे. चाकोरी
बाहेर जात प्रयत्न करणाऱ्या गुरुजींना यश हमखास मिळते हे पुन्हा एकदा दिसून आले.
अगदी प्रातिनिधिक स्वरूपात या शाळेतील १ ली च्या मुलांची ओळख करून देतो.
एकूण पट: ३०
भाषा विषयातील प्रभुत्व पातळी : पुनरावृत्ती, द्रोणाचार्य, वस्तुनिष्ठ
यांसारखे कोणताही अवघड
जोड शब्द वाचन, लेखन ही मुले करतात. ( ३० पैकी ३० ह)
चित्रवाचन : मी जेंव्हा एक चित्र दाखवत त्यांना वर्णन करायला सांगितले
तेंव्हा सर्वांनी मिळून एकूण 46 शब्द सांगितले.
तुम्ही देखील चकित झाले असाल कि १ ली च्या मुलांना हे कस शक्य आहे?
जादा तास घेत असतील गुरुजी? अंगणवाडी पासून तयारी असेल? ३६५ दिवस शाळा असेल? मुले
निव्वळ घोकंपट्टी करत असतील? असे जे नानाविध प्रश्न तुमच्या मनात आले असतील , तर त्यांच उत्तर ‘नाही’ असेच आहे. आणि १ ली च्या वयातील मुलांना
असे अभ्यासचे ओझे नको अस वाटणाऱ्या बालमानसशास्त्र अभ्यासकांनी देखील या शाळेस भेट
देवून मुलांची तपासणी करावी. ही मुले ओझ्याने दमली आहेत अस प्रत्यक्ष दर्शनी
बिलकुल जाणवत नाही.
सध्यस्थितीतील सर्व विचार
प्रवाहांना छेद देत लोकरे गुरुजीना त्यांची अध्यापन पद्धती विकसित केलीय.मुलांना
केवळ अक्षर व अंक ओळख करून न देता त्यांनी मुलांना स्वर –व्यंजन यांतील नातेच
उलगडून सांगितले आहे.शब्द तयार करण्यामागील रचना च मुलांना माहितीकरून दिली गेलीय
त्यामुळे तर ती मुले अशी अविश्वसनीय कामगिरी करत आहेत.
जी कथा मराठी ची तीच इंग्रजी ची देखील. तुम्हाला माहिती असलेला
कोणताही शब्द विचारा ....ती मुल स्पेलिंग सांगणारच . त्यांना फोनेटिक्स ची ओळख
करून दिलीय ना. त्यामुळे त्यांना अस कात्रीत पकडण कठीण आहे.तुमचे उच्चार मात्र
अचूक असावेत ह
गणित विषयात मात्र ही चिमुकली तुम्हालाच गोंधळात टाकतील. मी त्यांना खालील संख्या लिहून दाखवायला सांगितली .
सव्वा दोन कोटी
ही संख्या १० सेकंदाच्या आता १३ मुलांनी लिहून दाखवली. अन १
मिनिटामध्ये सर्व ३० जणांनी पूर्ण केली. संख्याशी खेळण्याची कला अवगत झालीय
त्यांना. आता या सव्वा दोन कोटी मधील कोणत्याही अंकाची स्थानिक किमंत , दर्शनी
किमत ते अचूक सांगतात.या संख्येवर बेरीज, वजाबाकी सारखी मुलभूत गणिती क्रिया ते
लीलया करतात.
हे सारंच अदभूत आहे. हा लेख वाचून किती जण विश्वास ठेवतील हे माहित
नाही ; पण प्रत्यक्ष भेट घेवून हा अनुभव घ्या. विचार करा अन प्रगत महाराष्ट्राच्या
दिशेने आश्वासक पाउल टाका.
सर्वाना शुभेच्या.
पुन्हा भेटूया.
रणजितसिंह डीसले , बार्शी.
छान सर .सलाम लोकरे सरांना त्यांचा आर्दश द्येतलाच पाहिजे.
ReplyDeleteSir mi aaj balewadila aplya stall la bhet dili. Stall khup awadla . aple manpurvak hardik ABHINANDAN. Aplya bhavi karyas shubhecha.
ReplyDeleteSir mala aplya blog var QR CODE download Karnyasathi link sapdli nahi. Please help me.
Sir mi aaj balewadila aplya stall la bhet dili. Stall khup awadla . aple manpurvak hardik ABHINANDAN. Aplya bhavi karyas shubhecha.
ReplyDeleteSir mala aplya blog var QR CODE download Karnyasathi link sapdli nahi. Please help me.
Sir mala aplya blog var QR CODE download Karnyasathi link sapdli nahi. Please help me.
DeleteReply
QRcode download link dya
ReplyDeleteSir mala aplya blog var QR CODE download Karnyasathi link sapdli nahi. Please help me.
ReplyDeleteReply
sir mala apalya blogvar QR CODE download link sapdali nahi plz help me. & reply
ReplyDeleteSir please send me QR code for class 1st to 7 th
ReplyDelete