मायक्रोसॉफ्ट च्या वतीने जगभरातील उपक्रमशील शिक्षकांचे जागतिक संमेलन नुकतेच टोरोन्टो येथे पार पडले. या संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली होती.या परिषदेचा थोडक्यात आढावा. ‘एज्युकेशन एक्शचेंज’ हे शिक्षणविषयक जागतिक संमेलन म्हणजे जगभरातील तंत्रस्नेही शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण उपक्रम जागतिक स्तरावर सादर करण्याचे हक्काचे ठिकाण.मायक्रोसॉफ्ट च्या वतीने मागील १० वर्षापासून हे संमेलन आयोजित करण्यात येतेय.कॅनडाच्या १५० व्या स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून यजमान पदाचा मान टोरोन्टो ला मिळाला. जगभरातील ३०० शिक्षकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.भारतातील ८ शिक्षक यासाठी पात्र ठरले,यांपैकी ५ जण या संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होवू शकले. शिक्षकांच्या उपक्रम निवडीची प्राथमिक प्रक्रिया दरवर्षी एप्रिल ते जुलै याकालावधीत पार पडते.यातून निवडले जातात ते ‘मायक्रोसॉफ्ट इंनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट’. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या शिक्षकांचे दे...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.