Skip to main content

Posts

Showing posts from August, 2017

सफर कासवाच्या हॉस्पिटलची..........रणजितसिंह डिसले

 भारतासारख्या देशात,  जिथे अनेक  नागरिकांना  पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नाही,आवश्यक संख्येएवढे दवाखाने नाहीत,  तेथील नागरिकांना  या लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  मानव सोडून इतर प्राण्यांकरिता देखील  आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात किंबहुना मुक्या प्राण्याचा तो अधिकार आहे,  हे भारतीय नागरिकांना कितपत रुचेल याबाबत माझ्या मनात  शंकाच आहे.भारत देशांचे नागरिक ज्या वर्गखोलीत घडवले जात आहेत , त्याच वर्गखोलीत बसून अमेरिकेत असलेल्या  कासवांच्या हॉस्पिटलची सफर करण्याचा अनुभव जि.प.शाळा,परितेवाडीच्या मुलानी  स्वातंत्र्यदिनी घेतला. त्याविषयीचा हा लेख ........          साधारणपणे दोन महिन्यापूर्वी कासवांच्या हॉस्पिटलबाबत मला माहिती मिळाली. शाळेतील  मुलांना मी याबाबत सांगितले तेंव्हा त्यानाही आश्चर्यच वाटले. कासवांना कोणते आजार होत असावेत? कासव आजारी पडलं हे कसं ओळखायचं? कासव औषध कसे खाणार? त्याला सलाईन लावायचे असेल तर कसे लावणार ?  अन मुळात म...