Skip to main content

Posts

Showing posts from 2019

निवडणूक प्रक्रियेतील तंत्रसुलभ पारदर्शकता

निवडणूक प्रक्रियेतील तंत्रसुलभ पारदर्शकता .......रणजितसिंह डिसले लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून गणली जाणारी लोकसभा निवडणूक सध्या पार पडत आहे. याद्वारे संविधानिक मार्गाने देशाचे सर्वोच्च राज्यकर्ते निवडण्याची संधी जनतेला मिळत असते. दर पाच वर्षांनी पार पडणारा हा  उत्सव जगभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. खासदार निवडीची हि प्रक्रिया यंदा सात टप्प्यात पार पडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातील ही निवडणूक प्रक्रिया अनेक अर्थानी महत्वाची ठरत असते. निवडणुकीसाठी  करण्यात येणारा प्रशासकीय  खर्च हा देखील अनेकांच्या कुतूहलाचा  विषय ठरला आहे.  निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात येणारा प्रशासकीय खर्च हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या युगात कागदविरहीत प्रशासनाकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे आणि ते कालसुसंगत देखील आहे. मात्र निवडणूक आयोगाचे पेपरलेस कारभाराकडे काहीसे दुर्लक्ष दिसून येते. आयोगाने ठरवले तर निवडणूक जाहीर केल्यापासून ते निकाल जाहीर करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पेपरलेस कारभार करता येवू शकतो. पर्यावरणपूरक निवड...