जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची शाळा , सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीची. तालुक्यालाच जिथं शहर म् हणता येणार नाही , अशी स्थिती तिथे गावची काय कथा ? शाळेची एक वर्ग खोली गोठा म्हणून वापरली जात होती , तिथे वर्गात इनमिन ५-६ मुलं असायची. बाकीची आपापल्या शेतात रमलेली. पण रणजितसिंह डिसले या स्मार्ट शिक्षकाने या शाळेचं नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचवले आहे. फळा आणि खडूत अडकलेलं परंपरातगत शिक्षण त्यांनी बदलून टाकलं. ‘क्युआर कोड’ आणि ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूपडं दिलं आणि शाळाबाह्य मुलांच्या जीवनात एक नवी पहाट उगवली . त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जगप्रसिध्द मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ या किताबाने गौरविलं आहे. हा पुरस्कार पटकाविण्या...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.