शाळा रात्रंदिवस सुरूच असतात आणि हो त्या केवळ चालत नाहीत धावतात,वेगात धावतात. सदर लेखात तमाम जनतेची दिशाभूल करणारी विधाने लेखकाने केली आहेत. तसा त्यांचा तो स्थायीभावच दिसतो.असो.तो मुद्दा नाही. कुलकर्णी मुळात शाळा चालत वगैरे नसतात तर शाळात शिक्षणाशी निगडीत कार्य सुरु असते. त्याला कालमर्यादा नसते. शाळा म्हणजे गाड्या बनवायची फक्टरी नसते. जिथे तासिका तत्वावर काम सुरु असायला. लेखकाने सुरवातीलाच असे सांगितलेय कि या वर्षी नाताळची सुट्टी १५ दिवस आहे. हि निव्वळ दिशाभूल.कारण नाशिक जी.प.शिवाय कोणत्याही जि.प, ने सुट्टी घेतलेली नाही.शिवाय सदर सुट्टी साठी नाशिक जी.प, ने इतर प्रासंगिक सुट्ट्या कमी केलेल्या आहेत. वर्षातील एकूण सुट्ट्यांची संख्या ७९ पेक्षा जास्त होणार नाही असे बंधन दिनांक २३.४.२०१३ च्या शासन निर्णयाने घातलेले आहे. प्रत्येक जि.प. आपल्या सोईने सुट्ट्या जाहीर करते. पण एकूण संख्या ७९ पेक्षा जास्त नसते. उदा. मराठवाडा मुक्तीसंग्राम ची सुट्टी फक्त मराठवाड्यातच असते. दोंदे पुण्यातीथीची सुट्टी फक्त सोलापूर जी.प. च घेते. हा स्थानिक प्रश्न आहे.आता १४५ दिवस सुट्ट्या असतात असा जावईशोध ...
Comments
Post a Comment