Skip to main content

Posts

Featured post

QR coded Text Books

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साध...
Recent posts

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील गुणवत्तेचा मानबिंदू : जि.प. शाळा, निकमवाडी ·          साधारणपणे सन २००७ सालचा प्रसंग आहे.सिंधुदुर्ग जि.प. ने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले गुरुजी जिल्हा बदली होवून मूळ जिल्ह्यात रुजू होण्यासाठी निकमवाडी  कडे निघाले.मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांना गावकऱ्यांनी अडवले व या शाळेत रुजू न होण्याचा धमकी वजा प्रेमळ सल्ला दिला.गुरुजी निराश झाले.पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. रोज गुरुजी शाळेत जायचे अन गावकरी त्यांना अडवायचे.हा सिलसिला १५-२० दिवस सुरूच राहिला. यादरम्यान शाळेत दुसरे गुरुजी आणण्याचे पडद्यामागील प्रयत्न देखील सुरूच होते. मात्र गावकऱ्यांच्या प्रयत्नास अपयश आले. प्रशासनाच्या खंबीर भूमिकेने गुरुजी निकमवाडी शाळेत रुजू झाले. गुरुजी शाळेत रुजू झाले खरे; पण गावकर्यांनी हार मानलीच नव्हती. आता तर शाळेतील वस्तूच गायब होवू लागल्या.रोज एक वस्तू गायब होत राहिली. एक वस्तू गायब झाली कि ती वस्तू गुरुजी विकत आणत.आश्चर्य वाटेल गुरुजीना नळाच्या तोट्या  तब्बल २० वेळा विकत आणाव्या लागल्या.पण पुढे तोट्या गायब होने ...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...