“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा. ” अरे काय तुला वेड लागलाय का ? चप्पल आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध. आहे हो. कसं आहे मित्रांनो जर आपले पाय पोळत असतील तर काय करतो आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत असतो. पण पाय पोळू लागले म्हणून तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे. आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू नका तुम्ही अगोदर चप्पल घाला मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा भ्रष्टा...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.