सरकारी शाळांसमोरील आव्हाने : उत्तरार्ध मागील भागात आपण ४ आव्हाने विचारात घेतली . आता शिक्षकांच्या संदर्भातील आव्हाने पाहू. आव्हान क्र ५. प्रशासनासमोर शिक्षकांच्या गुणवत्तेचा पूर्ण वापर करण्याचे आव्हान आहे. कसे ते पहा. सरकारी वा अनुदानित शाळांमधील शिक्षकांची निवड हि अनेक कठोर निकष लावत केली जाते. त्यामुळे हे सर्व शिक्षक गुणवत्ता धारकच असतात. याउलट विनानुदानित शाळांमध्ये हा निकष क्वचितच लावला जातो. मग जर सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता धारक शिक्षक असतील तर मग या गुणवत्ता धारक शिक्षकांचे विद्यार्थी का मागे पडतात ? हे न उलगडणारे कोडे आहे. याचा अर्थ असा होतो कि एक तर या शिक्षकांना कामात रस राहिला नसेल कारण काम केले अथवा न केले तरी आर्थिक स्थैर्य राहत असावे. नाहीतर या शिक्षकांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे कौशल्य प्रशासनाकडे नसावे. आता हे आव्हान आहे हेच काहीना मान्य नसण्याची शक्यता आहे. मात्र हे मान्य करा अथवा न करा वस्तुस्थिती बदलणार नाही. सरकारी शांलांमध्ये वेतन व काम हे दोन्हीही सरकारी पध्दतीने म...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.