भारतासारख्या देशात, जिथे अनेक नागरिकांना पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नाही,आवश्यक संख्येएवढे दवाखाने नाहीत, तेथील नागरिकांना या लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मानव सोडून इतर प्राण्यांकरिता देखील आरोग्यदायक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात किंबहुना मुक्या प्राण्याचा तो अधिकार आहे, हे भारतीय नागरिकांना कितपत रुचेल याबाबत माझ्या मनात शंकाच आहे.भारत देशांचे नागरिक ज्या वर्गखोलीत घडवले जात आहेत , त्याच वर्गखोलीत बसून अमेरिकेत असलेल्या कासवांच्या हॉस्पिटलची सफर करण्याचा अनुभव जि.प.शाळा,परितेवाडीच्या मुलानी स्वातंत्र्यदिनी घेतला. त्याविषयीचा हा लेख ........ साधारणपणे दोन महिन्यापूर्वी कासवांच्या हॉस्पिटलबाबत मला माहिती मिळाली. शाळेतील मुलांना मी याबाबत सांगितले तेंव्हा त्यानाही आश्चर्यच वाटले. कासवांना कोणते आजार होत असावेत? कासव आजारी पडलं हे कसं ओळखायचं? कासव औषध कसे खाणार? त्याला सलाईन लावायचे असेल तर कसे लावणार ? अन मुळात म...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.