Courtesy: facebook.com/NeeruMittal जगभरातील शिक्षकांचे लक्ष वेधून घेणारी घटना नुकतीच सिंगापूर येथे घडली. जगभरातील नवोपक्रमशील शिक्षकांचे तीन दिवशीय संमेलन नुकतेच सिंगापूर येथे पार पडले. याकरिता ९४ देशांतील ४०० हुन अधिक शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टच्यावतीने आयोजित हे संमेलन एज्युकेशन एक्सचेंज या नावाने ओळखले जाते. संमेलनाचे हे ४ थे वर्ष आहे. वर्गाध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मुलांच्या अध्ययन क्षमतेवर विशेष प्रभाव टाकणाऱ्या शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना जागतिक व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे. एक शिक्षक म्हणून स्वतःच्या व्यवसायिक विकासाची संधी देणारे हे संमेलन अनेक अर्थाने महत्वाचे ठरते. जगभरातील हे सर्व आमंत्रित शिक्षक वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जातात अन वर्गाध्यापनात भेडसावणारी कोणतीही एक समस्या निवडून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. भिन्न भाषा , भिन्न देश अन भिन्न संस्कृती अशा प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व शिक्षक एकत्र येवून का...
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून शिक्षणशात्र हा त्यांचा अभ्यासविषय आहे.तंत्रज्ञान विषयक अनेक नवनवीन प्रयोग ते शाळेत करत असतात.त्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट , प्लीकर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.