सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे सेलिब्रेशनचे दिवस. आपल्या जवळच्या लोकांना, मित्र - मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात मस्त पर्याय म्हणजे एसएमएस.पण हेच मस्त एसएमएस ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भलतेच महाग पडतात.
एरवी अमुक रुपयांमध्ये एवढे एसएमएस फ्री अशा अनेक स्कीम्सच्या जाहिराती सगळ्या मोबाईल कंपन्याकडून दिल्या जातात. पण ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या सेलिब्रेशनच्या दोन दिवसात मात्र अशा सगळ्या स्कीम्स बंद असतात. त्यामुळे हे दोन दिवस ' एसएमएस ब्लॅक आऊट डे ' म्हणून ओळखले जातात. ग्राहकांना एरवी दहा पैशांत, ३० पैशांमध्ये एसएमएस पाठवता येतात. मात्र या दोन दिवशी ग्राहकांना प्रत्येक लोकल एसएमएससाठी एक रुपया आणि नॅशनल एसएमएससाठी दीड रुपया आकारला जातो. त्यामुळे या दोन दिवसात आपल्या प्रिय व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे तुम्हाला महागात पडू शकते.
त्यामुळे एसएमएसमध्ये भरमसाठ पैसे घालवून बील वाढवण्यापेक्षा तुम्ही फेसबूक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या मदतीने किंवा ई-मेलद्वारा तुम्ही मित्र मौत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता. १६० बाय टू , वे टू एसएमएस या बेवसाईट्सवर लॉग-इन करूनही तुम्ही भरपूर एसएमएस अगदी फुकटात पाठवू शकता.

Comments
Post a Comment