Skip to main content

Income tax Planning



मित्रानो आज अतिशय वेगळ्या विषयावर मी लिहितोय. पण लिखाणात नेहमीच विविधता असावी असे मला वाटते. असो....आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. आणि याविषयी अनेक गैरसमजच जास्त आहेत. त्याविषयी सविस्तर अभ्यास करूनच हा विषय मांडतोय.
·         आयकर वकीलामार्फत निश्चित करूनच भरावा लागतो.
हा आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुळात Income Tax  विभागाने अशी कोणतीही सक्ती केलेली नाही. आयकर कसा निश्चित करावा यासाठी दरवर्षी आयकर विभाग परिपत्रक काढत असते. आपण त्याचे जरूर वाचन करावे. आणि या परीपात्रकानुसार आपला आयकर निश्चित करावा.एवढेच काय तर आयकर विभाग  Self  Assessed  Tax सुद्धा मान्य करते. मग आपला आयकर कसा निश्चित करावा.
उदा. समजा एका शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न ३१०००० आहे.
तर एकूण उत्पन्नाची वर्गवारी खालील प्रमाणे करावी


उत्पन्न
वजावट
महिना
मूळ
ग्रेड
एकूण
महागाई
प्रवास
घरभाडे
फरक
एकूण
व्य.कर
गटविमा
L.I.C.
P.F.
other
एकूण
एप्रिल














मे














जून














जुलै














ऑगस्ट














सप्टे














ऑक्टोंबर














नोव्हेंबर














डिसेंबर














जाने














फेब्रुवारी














मार्च














एकूण















वरील रकान्यात  आपण दरमहा आकडेवारी भरत जावी. शेवटी एकूण रक्कम लिहावी.
आता जर आपण वरील रकान्यात आपली माहिती भरली तर मग आपणाकडे एकूण वार्षिक उत्पन्न किती हे सांगता येईल.  आता वरील शिक्षकाचे एकूण उत्पन्न ३१०००० आहे असे समजूयात. त्याच वेळी आपणाला पगार पत्रकातील आयकर पात्र वजावटी लक्षात घ्याव्या लागतील. आता आयकर पात्र वजावटी मी पुढे सांगणार आहेच. तर या वजावटी ची एकूण रक्कम एकूण वार्षिक उत्त्पानातून वजा करावी. या वजाबाकी चे उत्तर म्हणजे आपले निव्वळ आयकर पात्र उत्पन्न होय.
समजा वरील शिक्षकाच्या वजावटी ४०००० च्या आहेत तर मग
एकूण वार्षिक उत्त्पन्न : ३१००००
वजा
एकूण आयकर पात्र वजावटी : ४००००
 निव्वळ आयकर  पात्र उत्त्पन्न :  २७००००
आता या शिक्षकांस २७०००० या रक्कमेवर प्रचलित नियमानुसार आयकर भरावा लागेल.
सन २०१४-१५ या वर्षायासाठीचे नियम पुढील प्रमाणे
·         आयकर मुक्त उत्पन्न मर्यादा
   सामान्य नागरिक, महिला . .................................२५००००
   जेष्ठ नागरिक .८० वर्षायाहून अधिक वय................५०००००
·         आयकर टप्पे
५००००० पर्यंत  १०%
५००००१ते १०००००० २०%
१०००००१ ते पुढे ३०%
अर्थात अजूनही पुढे टप्पे आहेत पण मी शिक्षकांना समोर ठेवत हे आकडे सांगतोय.


आता आयकर पात्र वजावटी त्यांची कलमे यांचा आढावा घेवूयात. त्यातून तुम्हाला आयकर नियोजन करणे सोपे जाते.
Section 80C:
हा शिक्षकांच्या सर्वात माहितीचा Section आहे. यात पुढील वजावटी पात्र आहेत.
·         Provident Fund (PF)
·         Mutual Fund investment
·         Government’s Debentures
·         Contribution to Govt. Fund
·         Postal Saving Scheme
·         Pension Plan
·         Tuition Fees
·         Time bonded fixed deposits in banks
·         LIC Policy Premium
80CCF : Long term Infrastructure bonds limit 20000

Section 80D
Health Insurance Premium    limit 15000
Section 80DDB
Medical treatments expenditure limit 50000
Section 80DD
Treatment of Handicapped child limit 50000
Section 80 G
Fund donation to NGO
 
आता वरील काही ठराविक कलमांचा उल्लेख केला आहे. मुलतः आयकर कायद्यात एकूण ११० Section आहेत.मी केवळ ३ Section चा उल्लेख याठिकाणी केला आहे. कारण शिक्षक याच Section मधील तरतुदींचा लाभ घेऊ शकतो.  आता याचा मी जरा सविस्तर विचार मांडतो.
आपल्या पगारातील व्यवसाय कर, गटविमा , गटविमा कर, फंड या वजावटी मान्य आहेत.मात्र आपणास अजून एक वजावट मिळू शकते ती म्हणजे
घरभाडे भत्ता.
कशी मिळवावी घरभाडे भत्ता वजावट?
                       मात्र त्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात.
१.      तुमच्या नावे कुठेही घर नसावे.
ही अट काळजीपूर्वक वाचा. घर तुमच्या आई, वडील, पत्नी,भाऊ कुणाच्याही नावे असू द्या. फक्त तुमच्या नावे नको. काही जण असेही म्हणतील आमचे घर गावाकडे आहे. मी दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करतो. तर नीट वाचा घर कुठे पण असो ते तुमच्या नावे नसावे.
मग आता काही जण असे म्हणतील कि घर तर माझ्या नावे आहे पण मी नोकरीच्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहतो. चालेल. या ठिकाणी तुम्हाला घरभाडे वजावट मिळेल. पण तुमच्या नावे जे घर आहे त्या घराचे घरभाडे तुम्हाला तुमच्या उत्पन्नात दाखवावे लागते.
आता काही जण असे म्हणतील कि मी माझ्या गावात किंवा गावाजवळ नोकरी करतो आणि माझे घर माझ्या वडील ,आई पत्नी च्या नावे आहे.तर मग तुम्ही पण घरभाडे सूट मिळवू शकता. तुम्ही तुमच्या वडिलांना , आईला, पत्नीला घरभाडे देता असे पावती द्यावी लागते. घाबरु नका!!!!!! आयकर विभागानेच तसे सांगितलेय कि you can pay rent to your father, mother .sister. brother ,wife as well.
आता वरील अटी पात्र केल्यात तर तुम्ही घरभाडे सूट मिळवण्यास पात्र आहात. पण सरसकट घरभाडे सूट मिळत नाही. त्याचे ३ निकष आहेत. त्या ३ निकषांपैकी सर्वात कमी रक्कम दाखवणारा निकष तुम्हाला तितकी वजावट मिळवून देतो.
उदा.एका शिक्षकास  एकूण वार्षिक मूळ उत्पन्न ३००००० इतके मिळते असे समजू आणि त्याला वार्षिक  ३२००० इतका घरभाडे भत्ता मिळतो .लक्षात घ्या आयकर विभागानुसार पगार Basic means (Basic +Grade Pay +Dearness Allowance) . मग तुम्ही तुमचे एकूण वार्षिक Basic काढा. यात कोणतेही फरक मिसळू नका. आणि एकूण घरभाडे काढा. आता हा शिक्षक महिना ५५०० घरभाडे देतो असे समजू.
घरभाडे सूट मिळवण्यासाठी तुमच्याकडे खालील आकडे लागतील
१.      प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे
२.      सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे
३.      एकूण  Basic Salary
आता आपल्या उदाहरणातील शिक्षकाचे आकडे पाहू.
१.      प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे  ....(५५००*१२)= ६६०००
२.      सरकारकडून मिळालेले एकूण घरभाडे =३२०००
३.      एकूण  Basic Salary=३०००००
४.       Actual house rent allowance received from your employer
५.       Actual house rent paid by you minus 10% of your basic salary
६.       50% of your basic salary if you live in a metro or 40% of your basic salary if you live in a non-metro
This minimum of above is  allowed as income tax exemption on house rent allowance.

आता घरभाडे सूट मिळवण्याचे निकष पहा
१.      सरकारकडून मिळालेले एकूण  घरभाडे
२.      प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे वजा १०% एकूण  Basic Salary
३.      ४०% एकूण  Basic Salary किंवा ५०% एकूण  Basic Salary
आता ४०% चा निकष इतर शहरानासाठी असून ५०% निकष ४ महानगरांसाठी आहे
आता आपल्या उदाहरणातील शिक्षकास किती सूट मिळेल ते पाहूयात.
आता घरभाडे सूट मिळवण्याचे निकष पहा
४.      सरकारकडून मिळालेले एकूण  घरभाडे = ३२०००
५.      प्रत्यक्षात दिलेले एकूण घरभाडे वजा १०% एकूण  Basic Salary(६६०००-३००००)=३६०००
४०% एकूण  Basic Salary किंवा ५०% एकूण  Basic Salary= १२००००
६.       

आता आपल्या कडे पुढील आकडे आहेत
·         ३२०००
·         ३६०००
·         १२००००
आयकर खात्याच्या नियमानुसार वरील ३ आकाड्यांपैकी सर्वात कमी रक्कम सूट म्हणून मिळते. त्यामुळे सदर शिक्षकास ३२००० इतकी रक्कम एकूण वार्षिक उत्पनातून वजा करता येते.

आता आपण जर काही दुर्धर आजारांवर उपचार केले असतील तर त्याचा खर्च देखील सूट म्हणून मिळवता येतो.
 तर खालील आजार लक्षात ठेवा
 Neurological Diseases where the disability level has been certified to be of 40% and above,—
        (a)   Dementia ;
        (b)   Dystonia Musculorum Deformans ;
        (c)   Motor Neuron Disease ;
        (d)   Ataxia ;
        (e)   Chorea ;
         (f)   Hemiballismus ;
        (g)   Aphasia ;
        (h)   Parkinsons Disease ;
              (ii)   Malignant Cancers ;
            (iii)   Full Blown Acquired Immuno-Deficiency Syndrome (AIDS) ;
             (iv)   Chronic Renal failure ;
              (v)   Hematological disorders :
         (i)   Hemophilia ;
        (ii)   Thalassaemia.
वरील नावे मुद्दामच आहे तशीच दिली आहेत.कारण आयकर विभाग इंग्लिश भाषेला प्राध्यान्न देतो. आता जर यापैकी कोणत्याही आजारावर तुमच्या घरातील व्यक्तींनी उपचार घेतले असतील तर जास्तीत जास्त ५०००० पर्यंत सूट मिळेल. अर्थात एकूण उपचार खर्च ५०००० पेक्षा कमी असेल तर मग उपचार खर्च वजा करावा. आता हि सूट कशी मिळवावी तर त्यासाठी Form no 10I  भरून घ्यावा. यावर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर ची सही लागते. सही करणारा डॉक्टर हा त्या आजाराचा तज्ञअसावा. अशी अट आहे.आता हि सूट तुमचे आई, वडील,पत्नी.मुले यांनाच मिळते.भाऊ, बहिणीला पण मिळू शकते पण ते तुमच्यावर अवलंबून असावेत अशी अट आहे.
मागील वर्ष्यापासून रोग प्रतिबंधक चाचण्यासाठी  खर्च केलेली रक्कम देखील वजा करता येते. यासाठी section 80D sub section (2)  नुसार ५००० पर्यंत सूट मिळेल. तसेच आरोग्य विमा १५००० पर्यंत वजावट मिळते. लक्षात घ्या या सर्व वजावटी section 80 c व्यतिरिक्त आहेत. आणि   section 80 c ची मर्यादा १५०००० आहे. शिक्षकांनी section 80 c व्यतिरिक्त इतर ही वजावटी लक्षात नियोजन करावे.
अजूनही काही शंका असतील तर मला लिहा








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilizat...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे : कितपत व्यवहार्य ......@@@ रणजितसिंह

                                                                                              मी साधारणत: जानेवारी २००९ मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्याच वर्षी मी माझी शिक्षक डायरी लिहिली होती.सन २००९ मध्ये मी वर्षभर काय काय काम केले? किती दिवस ट्रेनिंग घेतले? किती दिवस अशैक्षणिक काम केले ? याचा लेखा जोखा त्या डायरीत होता.                                              सध्या अशैक्षणिक कामामुळे सर्वत्र कोलाहल माजला असताना ही डायरी सर्वांशी share करावी वाटली.काही पाने सापडली.ती share करतोय.(www.ranjitsinhdisale.blogspot.in )त्यावेळी मी केलेली अशैक्षणिक कामंची नोंद त्यात आहे.तुम्ही देखील एकदा वाचाच कि शिक्षकांना किती कामे करावी लागतात...

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद मह...