Skip to main content

Posts

सुटलो रे बाबा सुटलो

                सुटलो रे  बाबा सुटलो तमाम भारतीयांना नमस्कार ! मी सरबजितसिंग बोलतोय. मला खूप खूप पश्याताप होतोय कि मी भारतात जन्माला आलो. जर मी पाकिस्तानी नागरिक असतो तर ना आज मी भारताच्या जेल मध्ये मस्तपैकी बिर्याणी खात बसलो असतो. जय हो गांधीजी ! तुमच्या आदर्श्यांवर भारताची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अहिसा हे तत्व सोनिया विसरलेल्या नाहीत ह ! गांधीगिरी चा विजय असो ! तिकडे चीन उद्या दिल्लीपर्यंत येण्याची आपण वाट पाहू. तोवर आपण निषेध नोंदवणे सुरु ठेउयात. इंग्रज काळात मवाळवादी नेते करत असत ते काम करण्याची आपली नीती किती कार्यक्षम आहे याचा आपण कधी विचार करणार आहोत ? त्या इटली च्या नौसैनिकांनी आपलेच जवान मारले आणि वर देशात पळून गेले. त्यांना फाशी देणार नाही म्हणून त्यानं परत आणले. आता काय त्यांना मरेपर्यंत पोसाय्चेय का?  भारतीयानो चला लवकर मेणबत्त्या घेऊन माझ्या अंतयात्रेला येणार ना ? आणि हो निषेधाचे फलक पण आणा ह. तुम्ही भारतीय ठेवढेच करू शकता. एक तर गांधीजींमुळे देशाला स्वातंत्र्य...
“ अनेकवेळा एमपीएससी देण्याऱ्या गरीब मुलाचे काही अजाण प्रश्न ”                                अखेर एम.पी.एस.सी. ने परीक्षा पुढे ढकलली. मुळात परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्याने बदल करणे हे एम.पी.एस.सी चे वैशिट्य आहे. मागील वर्षातील परीक्षाचे वेळापत्रक पहिले तर लक्षात येते कि PSI , STI , ASST, MPSC या परीक्षा नियोजित वेळापत्रकात बदल करूनच घेतल्या आहेत. मग यावेळी परीक्षा वेळेवर घेण्याचा अट्टहास का ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. वेळापत्रक न पाळणे , वेब साईटवर व्हायरसचा हल्ला होणे   हि तर बेजबाबदार कामाची पावती आहे. एक नजर टाकू अशाच कारभारावर.             मुळात एम.पी.एस.सी ने सर्व बदल यूपीएससी च्या धर्तीवर स्वीकारले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात जसा यूपीएससी ने गोंधळ माजवला तसा गोंधळ आपण पण घालू असे जर एम.पी.एस.सी वाटले तर चुकीचे नसावे. यूपीएससी चे बदल १.    ...

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा.

“ चप्पल घाला भ्रष्टाचार थांबवा. ”   अरे काय   तुला   वेड लागलाय का ? चप्पल आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध.   आहे हो. कसं आहे मित्रांनो   जर आपले   पाय पोळत असतील तर काय करतो   आपण चप्पल घालतो. मग जर भ्रष्टाचार रुपी उन्हात पाय पोळत असतील तर मग आपणच चप्पल घालावी लागेल. पण आपण काय करतो तर दुसऱ्याला सांगतो कि तुझा भ्रष्टाचार बंद कर. म्हणजे पाय आपले पोळतात आणि त्याला सांगायचे कि तू चप्पल घाल. अहो पण जर आपणच आपला भ्रष्टाचार बंद केला तर इतरांचे पाया पोळणार नाहीत. मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती . एका श्रीमंत बापाचा पोरगा उनात खेळत असतो. पण   पाय पोळू लागले म्हणून तो बाबांकडे येतो आणि म्हणतो बाबा सगळीकडे गेलो तरी पाय पोळतात. तुम्ही ना सगळीकडे कातडे अंथरा त्यामुळे माझे पाय पोळणार नाहीत. बाबा सांगतात कि त्यापेक्षा तूच पायात चप्पल घाल म्हणजे पाय पोळणार नाहीत. आपली अवस्था पण या पोरासारखी आहे. आपल्याला भ्रष्टाचार तर थांबवायचा आहे तर मग आपणच तो बंद करा न . दुसऱ्याला सांगू नका तुम्ही अगोदर चप्पल घाला   मागील भागात आपण वाचले कि एक शिक्षक कसा भ्रष्टा...

लोकशाही अमर रहे!

       नमस्कार ! “ IBN माझा “ च्या “ विशेष सवाल “  मध्ये आपले स्वागत. आजचा सवाल आहे              “ वागळे, खांडेकर गेले कुठे ? ”. आमचे संपादक वागळे आणि खांडेकर अज्ञातवासात गेल्यामुळे  मी जनतेचा सेवक आमदार क्षी.ठा.नालासोपारकर आपले मन:पूर्वक स्वागत करतो. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी जेलमधून थेट हा कार्यक्रम सदर करत आहे . लोकशाही अमर रहे! लोकशाही अमर रहे! अशा घोषणा देतच मी जेल मध्ये आलोय. बरं झाले त्या सूर्यवंशी ला चोपला ते.नाहीतर लोकशाही चा अपमान झाला असता. सारे पोलीस माजलेतच साले.थेट आमदार ची गाडी आडवतात ! काय अक्कल आहे कि नाही.आमदार म्हणजे जनतेचा सेवक,. या जनतेच्या सेवकाने १५० च्या वेगाने गाडी चालवली तर बिघडले कुठे? कुणाला उडवले तर नाही ना? जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी गाडी वेगात चालवावी लागते हे यांना कसे कळणार?. मी तर विधान सभा अध्यक्ष साहेबांकडे अशी मागणी करतो कि मला तर २०० च्या वेगाने गाडी चालवण्याची परवानगी द्या. नाही तर माझ्या मतदारसंघातून माझ्या वर टीका होईल.जनता माझ्या वर नारा...

भ्रष्टाचार

चला आपण  सगळे मिळून भ्रष्टाचार करू! हो ! वाचून जरा विचित्र वाटतंय ना . पण करूनच पाहू ना भ्रष्टाचार. मी तर रोजच करतो. कसा ? तर मग हे नक्कीच वाचा  मी आहे एक शिक्षक. मी रोजच शाळेत उशिरा जातो. रजा न मांडताच सुट्टीवर जातो. रजेच्या काळातील पगार साहेबांना लाच देऊन घेतो. शाळेचा अनुदान खर्च बोगस पावत्या जोडून दाखवतो. आणि जर ऑडीट मध्ये घोळ लक्षात आला तर ऑडीटर ला लाच देऊन ते प्रकरण मिटवतो. एखादा अधिकारी  ( केंद्रप्रमुख , विस्ताराधिकारी ) जर कारवाई करतो अशी धमकी देऊ लागला तर मग त्याला पण लाच द्यायची वर ढाब्यावरील जेवण पण  हं.  मग सांगा किती मस्त आहे सरकारी नौकरी. वाचकहो एका शिक्षकाला एवढाच भ्रष्ट्राचार करता येतो. जरा वेगळ्या बाजूने पहिले तर लक्षात येईल कि या सरकारी व्यवस्थेत जर एखाद्या शिक्षकाने जर प्रामाणिकपणे सेवा करायचे ठरवले तर त्याला जरा कठीणच जाते. पण मी जो भ्रष्टाचार सांगितला आहे तो त्याला करावाच लागतो.. मी काही समर्थन करत नाही पण जर मी तो केला नाही तर मग मला नाहक त्रास सहन करवा लागतो. कसा ते प...

love

                                                                                आणि अखेर प्रेमभंग झालाच ! मनातील भीती खरी ठरली.म्हणजे माझ्या प्रेमाचा तिने स्वीकार केला नाही , असे नव्हे . पण आमच्या प्रेमाचे लग्नामध्ये रूपांतर होणार नाही हे स्पष्ट झाले.कारण आमच्या प्रेमाची कुणकुण लागताच तिचे लग्न ठरवण्यात आले.एकदम पारंपरिक मार्ग.मुलीला भावनिक आवाहन करून लग्न जुळवणे.तिचा तो भावी नवरा गेली कित्येक दिवस तिच्या घरच्यांच्या मागे लागला होता.अखेर त्याची इच्छा फलद्रूप झाली.नशीबवानच तो. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत हे तर गेली अनेक वर्ष वाचत आलोय.अर्थ कळत नव्हता तेंव्हापासून वाचतोय. लोकमत च्या ऑक्सिजन...